पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकप्रकरण. ठरावांत घेतले तेव्हांपासून जे पुढे इंग्रजीत ग्रंथ झाले त्यांत याचा उल्लेख येत गेला व याला अनुसरून कित्येक ठरावही झाले आहेत. परंतु याला हिंदुधर्मशास्त्रांत प्रमाण कांहीं नाहीं. मुलाच्या आईशी नियोग संभवत असावा असे दत्तकचन्द्रिकाकार व दत्तक- मीमांसाकार ह्मणतात तेही चिन्त्यच आहे, कारण ते मूळांतील लेखांत चुकीवरून पुढे वाढले आहे. ७३ प्र० ३ ७२ मि० नेल्सन आपल्या हिंदुधर्मशास्त्रावरील ग्रंथांत असे ह्मणतो कीं, असा शा- स्त्राचा नियम आहे असे मद्रास इलारूपात ब्राह्मणवर्णापासून शूद्रापर्यंत कोणीही मानित नाहीं; व या इलाख्यांतही माझा अनुभव व शोध मला असे सांगतो कीं, मद्रासची स्थिति एथेंही अक्षरशः खरी आहे. हा नियम असता तर मुलीचे व बहिणीचे मुलगे कोणाच्याही हरकतीवांचून दत्तक घेतलेले हमेशा आढळतात ते कसे आढळले असते ? सदरचा नियम केवळ परदेशीय ग्रंथकारांच्या कल्पनेचा आहे. नियोग व दत्तविधान सारखी आहेत असे समजून एकाचे नियम दुसऱ्यास लावण्याचा यत्न मद्रास हायको- टीन केला होता.” तो गैरशिस्त असे प्रिव्ही कौन्सिलने ठरविले आहे. नियोग हा या युगांत मुळींच चालत नाहीं सबक त्यावरून दत्तविधानाचे नियम अनुमित करणें हें बरोबर नाहीं. याचप्रमाणे विवाहाचें साम्य मन्ांत आणून विरुद्ध संबंध होईल तर दत्तक घेऊं नये असे नन्दपण्डिताने लिहिले आहे तेही अपूर्ण विचाराचेंच आहे." अ लाहाबाद हायकोर्टाच्या मतें बकाल जातीस हा नियम लागणार नाहीं, कारण तिचा द्विजांत अंतर्भाव होत नाहीं. ७६ ७८ ( १०३.) दौहित्र व भागिनेय हे द्विजांनी घेऊं नयेत असे कित्येकांनी ह्मटलें आहे व येथील हायकोर्टात दोन ठराव व अलाहाबादचा एक असे झाले आहेत त्यांतही असें ठरविलेलें आहे." परंतु सदर प्रकारची दत्तविधानें धर्मशास्त्र जाणणाऱ्या कु- टुंबांत या इलाख्यांत होत आहेत; व मयूख, द्वैतनिर्णय, व कृष्णभट्ट या तीन ग्रंथकारांनीं ७२. म० हा० रि० १ पा० ४२०. मीनाक्षी वि० रामनाथ इं० ला० ११ म० ४९. ७३. याचा विस्तर इंग्रजी मोठ्या ग्रंथांत पहा, पृ० ४८०-४८३. ७४. पा० ९०- ७५. म० हा०रि० व्हा० ७ पा० ३०५. ७६. ला० रि० इं० अ० हा० ३ पा० १५४ किंवा ई० ला० रि० म० व्हा० १ पा० ६९. ७७. पहा इंग्रजी मोठा ग्रंथ पृ० ४८३-४८६. ७८. फॅडो वि० जंगीनाथ इं० ला० रि० १५ अ० ३२७. ७९. गोपाळ वि० हणमंत. इं० ला० रि० ३ मुं० २७३, व भागीरथीबाई कि० राधाबाई इं० १६ ला० रि० ला० रि० ३ मुं० २९८; पार्वती वि० सुंदर इं० ला० रि० ८ अ० १. ● इं० अ० १८६ हाही ठराव पहावा.