पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. घेणान्याच्याच वर्णाचा असला पाहिजे. परंतु एवढ्यावरून अन्यजातीय दत्तकच होत नाहीं असें ह्मणतां येणार नाहीं, कारण दत्तकचन्द्रिकेंत" सजातीयाच्या अभावी विजातीयही घ्यावा कारण त्याने वंशरक्षण तरी होतें, तो पिण्ड देण्यास व रिक्थ घे- ण्यास मात्र अधिकारी नाहीं, अशा अर्थाचें वृद्धयाज्ञवल्क्पवचन दिलेले आहे. याज्ञ- वल्क्यानें एका जातीचा पाहिजे असे सांगितलें. अनन्तदेव, गोपिनाथभट्ट व कृष्णभट्ट हे जातीच्या एका पोटभेदांतीलच मुलगा असला पाहिजे असे आणखी सांगतात. हे आचारानुसार आहे खरें. वचनाचे प्रमाण नाहीं. सदरच्या प्रतिषेधाच्या अतिक्रमानें झालेला दत्तक फक्त पोटगांचा अधिकारी हे मागेच सांगितले आहे. ( १००.) मुलाच्या वयाच्या संबंधानें हरकती हा वर्ग दुसरा. ६० ( १०१.) बारा दिवसांचा झाल्यापासून उपनयनपर्यंत केव्हांही मुलगा दत्तक घ्यावा. ° सपिण्ड व सगोत्र असेल तर उपनयनानंतर, लग्नानंतर, मुले झाली असल्या- स त्यांसुद्धांही, दत्तक घ्यावा." भिन्न गोत्रांतील असल्यास चौल होण्यापूर्वी घ्यावा, हा उत्तम पक्ष. २ तसें न होई तर मौंजीपूर्वी घ्यावा, असे कित्येक ह्मणतात; परंतु कित्येकांच्या मतें नंतरही घेतल्यास चालेल. दत्तक होणाराचें वय पांच ६३ ६४ ५८. मनु. अ. ९ श्लो. १६८ यावरील कुल्लूकाची टीका. दत्तकचन्द्रिका पा. ४९. दत्तकमीमांसा पा. ९. व्यवहारमयूख, भाग २ रा, पृ. १६२ पहा. ५९. पा. ४९. ६०. मार्लिज् डैजेस्ट, वालम १, पृ. २३, कलैम ९१. भिन्नशाखीय पुत्रही उपनयनापूर्वी घेतां येतो. संस्कारकौस्तुभ, प. ४६ पृ. २ पंक्ति ७. सापिण्डयप्रदीप व दत्तकमीमांसा हेही ग्रंथ पहावे. ६१. व्यवहारमयूख भाषान्तर, पृ. ३१; संस्कारकौस्तुभ प. ४६, पंक्ति १. धर्मसिंधु, परिच्छेद ३ रा पूर्वार्ध, प १४ पृ. १, पंक्ति ९. बारोडेलचे रिपोर्ट, वालम १, पृ. १८१–२०२, दादा दिवसपर्यंत आशौच असतें यास्तव तें जाईपर्यंत संस्कार होणेच नाहीं: भाग २ रा पृ. १६८. २४ नाथनजी वि. हरि मुं. हा. को. ८ गोपाळ वि. नारो मुं. हा. को. रि. ७ अपेंडिक्स अ. शी. पृ. ६७ वीरराघव वि. रामलिंग इं. ला. रि. ९ म. १४८. ६२. मार्लिज् डैजेस्ट; वालम १ पृ. २२, क. ८८, व्यवहारमयूख भाषान्तर, पृ. ३९, दत्तकमी- मांसा पाहा. निर्णयसिन्धु परिच्छेद ३, पू. प. ९पृ. २. पं. ११. ६३. मार्लिज् डैजेस्ट वा. १, पृ. २३, क. ९१ व ९२. संस्कारकौस्तुभ व दत्तकमामांसा यांचा- ही आशय असाच दिसतो. ६४..संकारकौस्तुभ, प. ४६ पृ. १, पं. १, धर्मसिन्धु, प. १४, पृ. १, १० परंतु असा पुत्र घेतला असता त्याचे संस्कार एका गोत्रांत झाले, व प्रतिग्रह दुसन्या गोत्रांत झाला, त्यामुळे तो द्वयामुष्यायण होतो अर्से ह्मणतात, व यासच नित्यद्वयामुष्यायण झटले आहे; तथापि अशाचें दत्त- विधान चालणार नाहींसें नाहीं.