पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ ५५ यावह' ह्मणजे पुत्र शोभण्यासारखा असावा असे शौनक सांगतो. इतक्या पायावर पुढे झालेल्या ग्रंथकारांनीं इमारत रचितां रचितां पुष्कळ नियम झालेले आढळतात; परंतु ते सर्व स्त्रा च्या सूचनांपैकी आहेत. त्यांचा अतिक्रम झाला असतां दत्तविधान रद्द व्हावे असे सांगि- तलेलेंही नाहीं व असा त्यांचा आशय असावा असेंही दिसत नाहीं. भिन्न वर्णाचा दत्तक झाला असतां तो वारशास अधिकारी होत नाहीं. परंतु पोटगांचा हक्क उत्पन्न होतो, असे झटलेले आहे. यावरून अर्थात् अन्य निषेधांचा अतिक्रम झाला असतां फार तर विध्य- तिक्रमाचें पाप कर्त्याला लागो; परंतु त्याणे केलेल्या दत्तविधानाला कोणताही बाध व्याव- हारिक रीत्या येणार नाहीं असे होतें. अलीकडे कित्येक ठरावांत नुस्तीं वाक्यें घेऊन. तीं लोकमान्य आहेत किंवा नाहीत याचा विचार न करितां, किंवा आचार कसा आहे हें न पाहतां, दत्तविधानें रद्द करण्याचें कोर्टानी केल्याचे आढळते. या काम प्रिव्ही कौन्सि- लचे न्यायाधीश यांणीं मदूराचे कलेक्टर वि० मुट्टरामलिंगा सेतुपति या कज्यांत. हिंदु- धर्मशास्त्राप्रमाणे फैसले करणाऱ्या न्यायाधीशांचें कर्तव्य काय याविषयीं सांगितले आहे ते प्रत्येक कोर्टानें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. तें असेंः– “हिंदुस्थानांतील युरोपियन न्यायाधी- शाला हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे निवाडा देण्याचें जेथें भाग असेल त्या स्थळी त्याचे कर्तव्य विवा- दांतील शास्त्रार्थ जुन्या वचनांत कोठें आढळतो कीं नाहीं हैं पाहण्यार्चे नसून, ज्या ठिकाण तंटा असेल त्या प्रांतीं तीं वचने त्या प्रांतांतील ग्रंथांनीं व लोकांनी गृहित आहेत की पाहणे हे आहे; कारण हिंदुशास्त्राप्रमाणे आचार अथवा रूढि ही वचनां- पेक्षांही बलवत्तर आहे. ५६ ( ९७. ) मुलगा दत्तक घेर्णे तो प्रथम भ्रातृपुत्र; त्याच्या अभावीं सगोत्र सपिण्ड; तसा नसेल तर असगोत्र सपिण्ड; व त्याच्या अभावीं असगोत्र असपिण्ड असा ध्यावा असे सांगितलेले आहे. परंतु हा क्रम अनतिक्रम्य असा लोकांनी मानिलेला नाहीं, व कोटींनींही ठराव असेच केले आहेत; ह्मणून ज्याला जो इष्ट असेल तो पुत्र तो. घेतो. विधवेनें अमुक कुळांतील मुलगा घेऊं नये असा ताकिदीचा दाषा चालणार नाहीं, असे बाबाजी वि. भागीरथीबाई ६ मुं. हा. रि. अ. शा. पृ. ७० ह्यांत ठरले आहे. ( ९८. ) आतां निरनिराळ्या ग्रंथकारांनी मुलाच्यासंबंधानें निरनिराळे प्रतिबंध सांगितले आहेत त्यांचें वर्गीकरण करून संक्षेपतः विवरण करितों. (९९.) मुलाच्या वर्णाच्या संबंधाच्या हरकती हा वर्ग पहिला. मुलगा दत्तक ५५. दत्तकचंद्रिका पा, ४९; दत्तकमीमांसा. पा. १८. ५६. मू. इं. अ. व्हा. १२ पा. ४३६.. ५७. श्रीमती उमादेवी वि. गोकुलानंद दास महापात्र ला. रि. इं. अ. व्हा. ५ पा. ४०. रंगम्मा वि. अच्चम्मा ४ मू. इं. अ. पृ. १.