पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३. दत्तकप्रकरण. ठरून हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे हिंदूंस न्याय मिळावा असा जो आमच्या सरकारचा स्तुत्य उद्देश तो विफल होऊन न्यायाधीश हे नवीन कायदे करणारे बनूं लागतील. ५१ ( ९४.) परंतु आतां पूर्वीचे ठराव फिरत आहेत. आई किंवा बाप किंवा त्यांनी ज्याला दानाचा अधिकार दिला आहे त्यानें दिलेला पुत्र रद्द होईलच असे नाहीं. मुंबई हायकोर्टानें- ही असेच ठरविले आहे. एके प्रसंगी दत्तक देणाऱ्या बापाने आपण आजारी असल्या- मुळे आपल्या भावास दान करण्याचा अधिकार दिला व ते दत्तविधान कायम झाले. पुष्कळ वर्षे दत्तविधान मान्य झाल्यावर दान करणारा कोणी नव्हता ही तक्रार न धरतां योग्य दाता होता असें धरून चालावे असे आनंदराव वि० गणेश ७ मुं. हा. को. रि. पृ० ३३ ह्यांत ठरले आहे. आईबापांच्या पश्चात् योग्य रीतीनें आपले आपणच होऊन झालेले पुत्र ह्मणजे स्वयंदत्त हे कायदेशीर दत्तक होतात; व श्राद्धाधिकारी क वारस होतात. मातापितृहीन असून झालेला दत्तक अल्पवयी असेल तर कृत्रिम, व वयांत आलेला असेल तर स्वयंदत्त गणिला जाईल. (पहा यज्ञेश्वरशास्त्रिकृत पुत्रकल्प- लता, पृ० २१. ) .( १५.) . कोर्टात अशा दत्तविधानाबद्दल वाद पडल्यास देशरिवाज शांबीद कर- ण्याचा यत्न पक्षकारांनी करावा ह्मणजे कोर्टे असा रिवाज मानण्यास तयार होतील. दत्तक घ्यावयाचा पुत्र कसा असावा. ( ९६.) पुत्र ध्यावा तो कसा असावा याविषयीं वरील स्मृतिशास्त्र फार थोडें आहे. योग्य प्रकारें दानप्रतिग्रह झाला की दत्तविधान झाले. दानप्रतिग्रह हीं झाली नसतील तर दत्तक कायम होत नाहीं, परंतु एरव्हीं नामनिर्देश करून त्या मुलास दत्तक ह्मणून संबंध न दाखवितां इस्टेट दिली तर दत्तविधान अशास्त्र ठरलें तरी ती इस्टेट त्याकडे चालते.५२ परंतु जर दत्तक होईल, तरच इस्टेट मिळावी अर्से असेल तर हा शास्त्रार्थ लागणार नाहीं. पुत्र ध्यावयाचा तो 'सदृश' असावा असे मनूनें सांगितले आहे.” व 'पुत्रच्छा- ५३ ५१. जमनादास वि. रायचंद इं. ना. रि. ७ मुं. २२५. ८ वेंकट वि. सुभद्रा इं. का. रि. ७ म. ५४९. विजयारंगम वि, लक्ष्मण ८ मुं. हा. रि. ( ओ. शा.) २४४. ५२, विरेश्वर मूकरजी वि. अर्धचंद्रराय इं. का. रि. १९ क. ४५२. ५३. आबू वि. कुप्पमक इं. ला. रि. १६ म. ३५५. ५४. अ. ९ श्लो, २६८.