पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

30 हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ ( ९३.) मिताक्षरेवरील टीकाकार विश्वेश्वर यांनी आपल्या सुबोधिनीनामक ग्रं- थांत सदरचें पुराणवचन घेऊन पुत्रिकापुत्र या युगांत आहे असे लिहिले आहे. यावर कमलाकरभट्ट यांनी विवादतांडवनामक त्यांच्या व्यवहारावरील ग्रंथांत याच वचनाच्या संबंध खाली लिहिल्याप्रमाणे लिहिले आहे:- 1- तत्र यद्यपि “ दत्तौरसेतरेषां तु पुत्रत्वे न परिग्रह इत्यादित्यपुराणे कलावन्ये पु- त्रानिषिद्धास्तथापि तत्समः पुत्रिकासुतइत्युक्तेः क्रीतस्वयंदत्तकृत्रिमाणां दत्तकत्वसाम्याच्च कलौ ते भवन्त्येव शुद्धचित्तानां नृणाम्. अर्थः-

- दत्त व औरस व्यतिरिक्त अन्य पुत्रांचा स्वीकार कलियुगांत निषिद्ध आहे

अशा अर्थाचें वचन आदित्यपुराणांत आहे त्यावरून अन्य पुत्र निषिद्ध होतात, तरी औ- रससम पुत्रिकापुत्र आहे असें सांगितलेलें आहे ह्मणून पुत्रिकापुत्र व दत्तकाशी साम्य आहे ह्मणून क्रीत, स्वयंदत्त, व कृत्रिम हे पुत्र धर्माचरण करणाऱ्या मनुष्यांना कलीमध्येही करून घेतां येतातच येतात. संस्कारकौस्तुभांत ४८ 'दत्त' पद उपलक्षणच मानिले आहे. ' व त्यांत स्वयंदत्ताचा समावेश केला आहे. अलीकडे यज्ञेश्वरशास्त्री यांनी पुत्रकल्पलता अनन्तदेवांनीही सदरच्या ह्मणून ग्रंथ केला आहे त्यांतही असा 'द्वत्त' पदाचा अर्थ केला आहे. पुराणवचनाच्या अंतीं जे कलीमध्ये निषेध सांगितले. ते 'लोकगुप्त्यर्थ' असे सांगितलेले आहे. 'लोकगुप्त्यर्थ १५० याचा अर्थ ‘ लोकनिन्दानिवृत्तये' ह्मणजे लोकांतील निंद्य कर्मों बंद करण्यासाठी असा जगन्नाथ यांनी विवादभंगार्णवांत केला आहे. याला अनुसरून पाहतां कानीन, सहोढज इत्यादि अनाचारानें उत्पन्न तेवढेच पुत्र कलियुगांत रद्द कर- ण्याचा त्या वचनाचा आशय दिसतो व तशी रूढिही आहे. परंतु स्वयंदत्त किंवा कृ- त्रिम पुत्र होण्यांत निंद्य कांहीं नाहीं, ह्मणून तसा पुत्र घेण्याचें लोकांनीं वर्ज्य केल्याचें आढळत नाहीं. इतका विस्तार करण्याचे कारण सदरीं लिहिलेले पुराणवचन जमेस धरून मुंबई हायकोर्टाच्या व्हा० १० पा० २६८ येथील ठरावांत बरीच टीका केलेली आहे. ती सर्व त्या वचनाचा प्रथम दर्शनी भासणारा अर्थ धरून आहे. सदरीं लिहिलेले ग्रंथकारांचे अभिप्राय कोर्टाच्या नजरेस आणल्याचे दिसत नाहीं. मला वाटतें कीं, आ- मच्या वचनाचा अर्थ करणें तो आचार व आचार जाणणाऱ्या ग्रंथकारांचे लेख यांना धरूनच केला पाहिजे. केवळ व्याकरण व कोश घेऊन अर्थ केला तर भलभलतेच शास्त्रार्थ ४८. पहा. पान ७ ४९. पार्ने १२-१८. ५०. ते वचन असेंः एतानि कोकगुप्त्यर्थं कलेरादौ महात्मभिः । निवर्ततानि कर्माणि व्यवस्थापूर्वकं दुधैः॥