पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ प्र० ३ दत्तकप्रकरण. रुराव रूढीस विरुद्ध आहेत. केवळ ग्रंथवचनें पाहावयाची झटले तरी वसिष्ठवचनांत मातापितरांची सत्ता इतर जिनसांवर असते त्यांतीलच आहे. मग साधारणपणे आपल्या. मालकीचा जिन्नस ज्याप्रमाणे स्वतः त्याचप्रमाणे प्रतिनिधीमार्फत देण्याचा अधिकार प्रत्येकास आहे ही गोष्ट स्मरतां असें वाटतें कीं, दत्तकाच्याच कामीं तो अधिकार को नष्ट व्हावा हे सांगतां येणार नाहीं. क्षणमात्र असें मानिलें कीं, मनु याज्ञवल्क्यांनी सांगितलेले दत्तकाचें लक्षण अशा मातापितृमरणानंतर दत्तक झालेल्या पुत्रांवर बसत नाहीं, तथापि असे पुत्र हे कृत्रिम किंवा स्वयंदत्त मानून त्यांचा हक्क कां. कबूल करितां येणार नाही समजत नाहीं; आणि आजा हा तर पिताच होय; व “ ज्येष्ठो भ्राता पितुः समः " हें. मन्वादि ऋषींस अभिमत असून, रामायणादि ग्रंथांवरून ह्या ग्रंथाप्रमाणे अद्यापि आचारही दिसतो. मी पूर्वी असे लिहिले आहे कीं, स्वयंदत्त व कृत्रिम हे पुत्र हल्लींही चालतात. हा लेख मी फार दिवस निरनिराळ्या ठिकाणी मोठ्या श्रमानें माहिती मिळवून नंतर लिहिला आहे. जर रूढींत असे दत्तक आढळतात, तर कधीं लोकांनी गृहीत केली नाहींत अशीं वचनें उकरून काढून त्यांच्या बलावर ते दत्तक रद्द ठरविणें हें सर्वथा अन्याय्य आहे. युक्तीनें • पाहतां मातापितरें आहेत तेथपर्यंत त्यांच्या इ- च्छेविरुद्ध दुसऱ्याने दिलेला पुत्र तो कायदेशीर दत्तक न व्हावा है योग्यच; प-- रंतु मातापितरें स्वर्गस्थ झाल्यानंतर पुत्र निदान आपला आपण तरी मालक झाला, मग त्याला स्वतःचे दान कां करतां येऊं नये ते समजत नाहीं. ग्रंथांचे आधारही माझ्या अभिप्रायास अनुकूल असेच आहेत. मिताक्षरा, आचारमाधव, व वीरमित्रोदय ग्रंथांत बारा जातींचे पुत्र सांगून दोन सोडून बाकीचे वर्ज्य असे सांगणाऱ्या पुराणवच- नाचा उल्लेख केलेला नाहीं. यावरून त्यांनी या वचनाचे महत्व मानिलें नाहीं असे. दिसतें व तेंच आचार पाहतां सयुक्तिक दिसतें. अलीकडील ग्रंथकारांनीं आदित्यपुरा णांतील वचन " दत्तौरसेतरेषां तु पुत्रत्वे न परिग्रह: " जमेस धरून श्रुतिस्मृतींशीं एक- वाक्यता होईल असा त्या वाक्याचा अर्थ केला आहे. त्याचा इत्यर्थ इतकाच की, हल्लीं निदान दत्तक, कृत्रिम, व स्वयंदत्त, इतक्या जातींचे पुत्र होतात व या तीनही जातींच्या पुत्रांचा समावेश 'दत्त' पदानें होतो व अशा विस्तृत अर्थींच 'दत्त' पद सदरच्या पुराणवचनांत योजिलेले आहे. नन्दपण्डितानें दत्तकमीमांसेंत हे वचन.. नमूद करून ' कृत्रिम ' हा हल्लीं होतो असें सिद्ध केले आहे. एकदां 'दत्त' हे पद उपलक्षण मॉनिले ह्मणजे कृत्रिमावांचून स्वयंदत्तादि निर्दोष अन्य पुत्र आहेत त्यांचें नि- वारण होण्यास मार्ग नाहीं. माग रा, पृ. १६६ पहा.