पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ ४० इच्छेस येईल तेव्हां घ्यावा.' तिच्यावर भाऊबंदांची अथवा कोर्टाची सक्ती नाहीं. दत्तक घेईपर्यंत ती मालक समजावयाची. दत्तक घेतल्यानंतर मिळकतीचा मालक दत्तक; व तो अल्पवयी असेल, तर तिचें पालन करण्याची अधिकारिणी दत्तक घेणारी आई होय. अमुक जातींत विधवांनी दत्तक घेण्याची चाल नाहीं अशी तकरार आल्यास तिचा पुरावा फार बळकट झाला पाहिजे. मला दत्तक घेण्यास अधिकार आहे असे सांगून घेतलेला मुलगा त्याला वाढवल्यावर व नवऱ्याचें श्राद्ध वगैरे करविल्यावर तसा नाहीं असे विधवेला ह्मणतां येणार नाही.. ४२ ४३ ४४ ४५ ( ९२. ) पुत्र दत्तक देणें तो मातापितरांच्या हयातीत उभयतांनी द्यावा. स्त्रीच्या अनुमतीवांचूनही भर्ता देऊं शकेल. मातेला स्वतंत्रपणे देण्याचा अधिकार नवयाच्या हया- तींत तो परदेशी असल्यास, अथवा संन्यस्त किंवा उन्मत्त झाला असल्यास येतो. त्याच्या "पश्चात् ती देण्यास मुखत्यारच आहे. परंतु देऊं नको अर्से नवव्याने स्पष्ट सांगितलें असल्यास देतां येणार नाहीं. ४ सावत्र आईस दत्तक देण्याचा अधिकार नाही. " याहून अन्य दान करण्याला अधिकारी नाही, असे वचनावरून दिसत आहे, तरी हा अधिकार दुसऱ्याकडे संपविण्यास बाघ कांहीं दिसत नाहीं, व- असा- आचारही आढळतो, ह्मणजे आज्याने किंवा भावानें दिल्याची उदाहरणें पुष्कळच आहेत, ह्मणून ही चाल प्रशस्त आहे असें दिसतें. अशीं दत्तविधानें झाली असतील त्या ठिकाणी आईबापांतून कोणी दत्त क द्यावा असे सांगितलें होतें असें शाबीत केल्यास, अथवा अशा सांगीशिवायही असें दत्त- विधान करण्याची चाल आहे असे झाल्यास अशा दत्तविधानास बाघ येऊं नये अर्से दिसतें. पूर्वी कांही ठराव असे झाले होते कीं, दान करण्यास मातापितरें मात्र अधिकारी आहेत, तेव्हां तीं उभयतां मेल्यावर मुलाचें दत्तविधान झाले तर ते अशास्त्र. ६ परंतु हे ४६ ४०. गिरिआवा वि. भीमप्पा इं. का. रि. ९ मुं. ५८. ४१. पटेल वृंदावन वि. पटेल मणीलाल इं. ळा. रि. १६ मुं. ४७०. ४२. कन्नमल वि. वीरस्वामी इं. ला. रि. १५ म. ४८६. ४३. मिताक्षरा, ध्य. अ. ( व्य. श्लो. १३० ) प. ५५ पृ. १. व १६७ पाहा. ४४. नारायणस्वामी वि. कुप्पुस्वामी इं. ला. रि. ११ म. ११३. ४५. पापमा वि. आपाराव इं. ला. रि. १६ म. ३८४. . व्यवहारमयूख – भाग २ पृ. १६६ ४६. सुबलवम्मल वि. अम्मकुट्टी, म. हा. रि. व्हा. २, पा. १२९, बळवंतराव भास्कर वि० बयाबाई, मुं. हा. रि. व्हा. ६. ( अव्बल शाखा पा. ८३. ) भगवानदास वि. राजमल मुं. हा. को. रि. व्हा. १०. पृ. २४१. सुरतचे कलेक्टर वि. धीरसंगजी मुं. हा. रि. व्हा. १०, पृ. २३५. चशेय्याप्पा वि. शिवलिंगाप्पा, मुं. हा. रि. व्हा. १०, पा. २६८.