पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ₹ दत्तकप्रकरण. ३६

अनुमति पाहिजे असे मुंबई हायकोटीने ठरविले होतें. ५ परंतु मुख्याची ह्म० सासरा असल्यास त्याची एकट्याची संमति पुरे आहे असें अलीकडे ठरले आहे. गोपाळ वि० नारो ( मुं. हा. को. रि. ७ परि. पृ. २४) ह्यांत ठरले होतें कीं, भाऊबंदांची संमति पा- हिजेच असेल तर कोणाची तरी असली ह्मणजे पुरे; परंतु रूपचंद वि० रखमाबाई ( मु. हा. को. रि. ८ अ. शा. पृ. ११४) ह्यांत असे ठरलें कीं, ज्या ठिकाणी विधवेकडे धनाधिकार आला असेल तेथें तिला कोणाचीच संमति नको, जेथें दुसऱ्याकडे गेला असेल तेथें त्याची पाहिजे. ( ९१. ) महाराष्ट्र देशांत तरी विभक्त कुटुंबांतील विधवेला दत्तक पुत्र घेण्याचा अ- धिकार नवऱ्याच्या किंवा त्याच्या सपिंडांच्या अनुमतीवांचूनही आहे हे निर्विवादपण ठरले आहे. दोन विधवा असतां तो अधिकार वडील विधवेचाच, “ कारण वडील पत्नी मात्र सहधर्मचारिणी असे शास्त्रांत सांगितलेलें आहे." विधवेनें दत्तक घेणें तो तिच्या ३७ ३८ ३५. रामजी वि. घमाऊ; दिनकर वि. गणेश इं. का. रि. ६ मुं. ४९८. ३६. विठोबा वि. बापू इं. ला. रि. १५ मुं. ११०. ३७. रखमाबाई वि. राधाबाई, मुं. हा. रि. व्हा. ५ अ. शा. पा. १८१. विनायक वि. जी. आय. पी. रेलवे. मुं. हा. को. रि. ७ ओ. शा. ११३. गिरिआवा वि. भिमाप्पा इं. का. रि. ९ मुं ५८. तर्सेच आस्वाल जैन जातींत (माणिकचंद मि. जगत् शेटाणी इं. का. रि. १७क ५१८.) . हैमन चलसिंह वि. कुमार घनश्यामसिंह. वि. री. व्हा. ५ प्रि. कौ. ६९. बारोडेलचे रपोर्ट, वाळम १ पृ. १८२ – २०३; मारीसचे रिपोर्ट भाग १, पृ. १ – ११ स्पेशल अपील नं. २३७६; मद्रास हायकोर्ट रिपोर्ट, वालम २ पृ. १०६ स्पे. अ. नं. ३६९ सन १८६५. ता- २८ सेप्टेंबर १८६५. या सर्वांत नवऱ्याच्या अनुज्ञेचे कारण नाहीं असे स्पष्ट सांगितलें आहे. सर्पि- डांची पुरे होते. ( इं. ला. रि. १ मुं. ६९ व १७४ ), संस्कारकौस्तुभ, पत्र ४५, पृ. २, पंक्ति ४, वीर• मित्रोदय, इ. १८८, पृ. २ पंक्ति ९; यांत शास्त्राची अनुज्ञा आहे, ती पुरेशी आहे, यास्तव दुसऱ्या अनु- ज्ञेचें कारण नाहीं अर्से लिहिलेले आहे. दुसरे अर्से कीं, दत्तकविधींत " पुत्रं ग्रहीष्यन् बन्धूनाहूय राजाने चावेद्य निवेशनस्य मध्ये व्याहृतिभिर्हुत्वा अदूरबान्धवम् सन्निकृष्टमेव गुण्हीयात् ” अर्से सांगितलेले आहे, ( वीरमित्रोदय, पत्र १२२ पृ. २. ) तर यांत “बन्धूनाहूय" ह्मणजे बन्धूंस बोलावून त्यांच्या समक्ष घ्यावा असें मात्र आहे. त्यांची आज्ञा पाहिजे असे नाहीं. " ३८. मुं. हा. रि. व्हा. ५ वि. अ. शा. पू १८१. पदाजीराव वि० रामराव इं. ला. रि. १३ मुं. १६०. . धर्मसिंधु, परिच्छेद ३, दत्तकप्रकरण, पत्र १३, पष्ठ २, पंक्ति १०; वीरमित्रोदय, पत्र १८८, पृष्ठ २, पंक्ति ६. पुणे येथे सुमारे २५ वर्षांवर " दत्तभास्कर " या नांवाचा ग्रन्थ त्र्यंबकशास्त्री शालि- ग्राम यांणी केला आहे, त्यांत अनेक विधवांनीं अनेक दत्तक घ्यावे असा ठराव केला आहे, परंतु तो पक्ष शास्त्रविरुद्ध असून, सांप्रतच्या कोर्टाच्या ठरावांसही विरुद्ध दिसतो. मोठी विधधा दत्तक घेण्याचें नाकारलि तर धाकटीनें घ्यावा. मंदाकिनी वि. आदिनाथ इं. ला. रि. १८ क. ६९. ३९. याज्ञवल्क्य अ. १ श्लो. ८८.