पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ दर्शविलेल्या आधारांवरूनच कोणत्याही वयांत दत्तक घेतला असतां तो रद्द होणार नाहीं असेंच निष्पन्न होतें; कारण विवाह व दत्तविधान यांची मातचरी तीं कर्मे करणाया वयावर अगर अकलेवर अवलंबून नाहींत. दत्तविधान हें कराराच्या स्वरूपाचें नाहीं; सं- स्काराच्या स्वरूपाचें आहे, ही गोष्ट ध्यानांत धरली ह्मणजे वयाची आडकाठी त्या वि- धीस नसावी हेंच योग्य आहे, व असाच सन १८७५ चा आक्ट ९ याचाही आशय दिसतो. अज्ञान विधवेला दत्तक घेतां येतो.3 विधवेनें दत्तक घेतलेल्या मुलासंबंधाने तिचा नवरा मरतेवेळी अज्ञान होता ही हरकत चालणार नाही. २४ ७८ (८८.) एक दत्तक पुत्र ज्याणें घेतला आहे त्याला पहिला जिवंत आहे तो दुसरा पुत्र घेण्यास अधिकार नाहीं." दुसरें केलेलं दत्तविधान रद्द मानिले जाईल. परंतु तो निपुत्रिक मरेल तर दुसरा घेण्यास अधिकार आहे. २६ औरस किंवा एक दत्तपुत्र असल्यामुळे अ शास्त्र रीतीनें झालेले दत्तविधान पूर्वीचा औरस किंवा दत्तक मृत झाल्याने कायदेशीर होणार नाहीं, २७ असे ठरले आहे. एकदम दोन मुलगे दत्तक घेतां येत नाहीत, परंतु मद्रास इलाख्यांत एका कज्यांत नायकिणीच्या जातींत एकदम पुष्कळ मुली घेण्याची चाल शा- बीद झाली. २८ २९ ( ८९ . ) जे स्वतः अनंश ह्मणजे रिक्थग्रहणाधिकारी नाहीत, त्यांनी घेतलेल्या दत्तपुत्रांस भरणपोषणापलीकडे वारशाचा हक्क प्राप्त व्हावयाचा नाहीं. जे अनंश 30 २३. मंदाकिनी दासी वि. आदिनाथदेव इं. ला. रि. १८ क. ६९. २४. पटेल वृंदावन वि. पटेल मंणीलाल इं. ला. रि. १५ मुं. ५६५. २५. मू. इ. अ. वा. ४, पृ. १-११३, रंगम्मा, वि० आचम्मा, व रामनाथ. -- कलकत्ता हाय- कोर्ट रिपोर्ट ( मार्शलचे, ) वालम १, पृ. ३१७-३२२; मुंबई हायकोर्ट, स्पेशल अपील नं. ४, सन १८६७, ता. ९ जुलई १८६७, गणपतराव विरेश्वर जाईल व दुसरा, वि. विठोचा खंडाप्पा गुळवे व दुसरे, महेश नारायण मुनशी वि. तारकनाथ मैत्र, इं. ला. रि. २० क. ४८७ २६. लक्ष्मीचंद वि. गदोबाई. इं. ला. रि. ८ अ. ३१९. २७. बसू वि. बसू, म. सिलेक्टेड डिक्रीज्, सन १८५६, पा. २०. २८. ग्यानेंद्र चंद्र वि. कलापहार इं. ला. रि. ९ क ५०. दुर्गा सुंदरी वि. सुरेन्द्र इं. ला रि. १२ व ६८६. अस्खयचंद्र वि. कलापहार इं. ला. रि. १२ क. ४०६. सुरेंद्र वि. दुर्गासुंदरी इं. ला. रि. १९ क. ५१३. बैंक वि. महालिंग हूं. ला. रि. ११ म. ३९३. २९. मुदुकानु वि. परमस्वामी इं. ला. रि. १२ म. २१४ ३०. दत्तकचंद्रिका पा० ६४; मिताक्षरा ( व्य• श्लो० १४१ ) प० ६२ पृ० १.