पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकप्रकरण. च्या स्वरूपाचेच आहे; आणि ते असे कां समजू नये है मला समजत नाहीं. स्वर्जित मिळकतीवर बापाचें स्वत्व अप्रतिबद्ध आहे, तेव्हां त्यापुरता तरी दत्तक निःसंशय मा- "नला जावा हें युक्तच दिसतें. ७७ २० (८६.) अविवाहित किंवा विधुर पुरुषास दत्तपुत्र घेतां येत नाहीं, कारण पुत्र उत्पन्न होण्याचें साधन त्यानें केले नाही, असे कित्येकांचें ह्मणणे आहे. परंतु ब्रहा- चायला ऐहिक व पारमार्थिक हित साधण्याची जरूरी गृहस्थाइतकीच आहे तेव्हां त्यानें दत्तक कां न घ्यावा ? दत्तक न घेतं येण्यास प्रमाण आढळत नाहीं. शिवाय अशानें घेतलेला मुलगा कायदेशीर आहे असा आतां ठराव झाला आहे. विधुरावि- षयीं तर विधवेच्या अधिकारापेक्षां विधुराचा अधिकार कमी असण्यास कांहीं कारण नाहीं. अशी दत्तविधानें देशाचारानुसारी असून, ती कायदेशीर आहेत असें कोर्टानींही ठरविले आहे." नायकिणींस दत्तक घेतां नाहीं असें मथुरा वि. येसू (इं. ला. रि. ४ मुं १४५ ) ह्यांत मुंबई हायकोर्टानें ठरविलें होतें, परंतु तारा नायकीण वि. नाना लक्ष्मण ( इं. ला. रि. १४ मुं. ९० ) ह्यांत उलट. ठराव झाला आहे. मद्रास हाय को- टीनें त्यांस दत्तक घेतां येतें असें वेंकू वि. महालिंग ( इं. ला. रि. ११ म ३९३. ) व मुटु कानू वि. परमस्वामी ( इं. ला. रि. १२ म. २१४.) ह्यांत ठरविले आहे. ● 66 ( ८७.) दत्तक घेणारा अथवा अनुमती देणारा अप्राप्तव्यवहार ह्मणजे अल्प- वयी आहे ह्मणून दत्तविधान रद्द होणार नाहीं. म. जस्टिस द्वारकानाथ मित्र यांनीं एका मुकदम्यांत ठरविलें आहे की, सारासार समजण्याच्या वयांत आलेल्या मुलानें केलेलें दत्तविधान रद्द होऊं शकणार नाहीं.” त्या कज्यांत दत्तक घेणाराचें वय पंधरा वर्षांचें होतें ह्मणून " समजुतीत आलेल्या मुलानें " असे शब्द मि. जस्टिस मित्र यांनी घातले. याहून त्या शब्दांचा विशेष अर्थ नाहीं, कारण त्यांनी या ठरावास जी प्रमाणे दिली आहेत त्यांत सज्ञान व अज्ञान असा भेद मुळींच केलेला नाही. हे निरर्थक शब्द घातल्यानें मि. मेन यांस भ्रम होऊन त्यांनी समजुतीचें वय तें कोणतें अशाबद्दल कोठें सांगितलेलें नाहीं असें सांगून नंतर दाहांपासून सोळा वर्षेपर्यंत दत्तक घेतल्यास हरकत नाहीं असे भासतें असा आ पला अभिप्राय लिहिला आहे. वस्तुतः याला प्रमाण कांही नाहीं. मि.ज. मित्र यांनी . २०. गोपाळ अनंत वि० नारायण गणेश इं. ला. रि. १२ मु. ३२९. इं. ला. रि. १२ अ. ३५२. २१. गुणप्पा वि० संगप्पा, मु० सिलेक्टेड रि० पा० २०२; नागप्पा वि० सुब्बशास्त्री, म० हा० रि० व्हा० २, पा० ३६७; चंडशेखरूढ वि० ब्रह्मप्पा, म० हा० रि० व्हा० ४ पा० १७०. २२. वी० रि० व्हा० १५ पा० ५४८: हाच ठराव प्रिव्ही कौन्सिलच्या एका ठरावांत (ला० रि० ई० अ० हा० ३ पा० ८३), व इं० ला. रि. क. व्हा ५ पा. ३६३ येथें मान्य केल्यासारखा आहे.