पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ हिन्दु धर्मशास्त्र. प्र० ३ ( ८४.) दूत्तविधाना हेतु केवळ पारलौकिकच नाहीं असें मार्गे सांगितलें आहे. त्यावरून हिंदु धर्मापासून निराळे झालेल्या जैनांसारिख्या लोकांत, व नांवाचे मात्र हिंदु परंतु हिंदुशास्त्राप्रमाणे आचार फार थोडा अशा लोकांच्या कांहीं जाती आहेत, स्यांत दत्तविधान आढळावें" हे उपपन्नच आहे. प्रत्येक दत्तविधानाच्या कज्यांत दत्त- विधान झाले किंवा नाहीं व तें धर्मशास्त्राप्रमाणे बरोबर आहे किंवा नाहीं, ह्मणजे दत्त घेतलेल्यास दत्तकपुत्राचे कायदेशीर हक्क प्राप्त होतात किंवा नाही हे जज्जाने ठरविलें पाहिजे. ४ दंतक. घेण्याचे अधिकारी. 98 १७ ( ८५. ) जो अपुत्र किंवा मृतपुत्र असेल त्यानें दत्तपुत्र घ्यावा." जे कुटुंब मू- ळचें हिंदु नाही त्यांत दत्तक घेतला तर तसे करण्याची चाल आहे असे शाबीत केलें पाहिजे.' एथें 'पुत्र' पदानें पुत्र, पौत्र, व प्रपौत्र यांचा समावेश आहे ह्मणून नातू किंवा पणतू जिवंत असतां दत्तक घेतां येणार नाहीं. ७ 'मृतपुत्र' असें ह्मटले आहे या वरूम पुत्र जिवंत असतांही पातित्य महारोगादिक आपत्तींनीं तो ग्रस्त असल्यामुळे धर्मा- चरण आणि रिक्थग्रहण या दोन्हीसंबंधाने जर तो मृततुल्य असेल तर दत्तक घेतां आला पाहिजे, व अशी चालही आहे." बायको गरोदर असतां दत्तक घ्यावयाला हरकत नाहीं. मृत्युपत्रानें औरसाचा हक्क कमी करता येणार नाहीं.' 99 औरस मुलाने धर्मांतर केलें असतां तो पुत्र कृत्यांस अनधिकारीच झाला तेव्हां तो मृतासारखाच मानून त्याच्या ऐवज दत्तपुत्र घेतां आला पाहिजे. मि० मेन ह्मणतो की, सन १८५० चा आक्ट झाल्यापासून धर्मांतरानें वारशाचे हक्क नष्ट होत नाहींत तेव्हां दत्तकाला मिळकतीचे हक्क कांहींच प्राप्त होणार नाहीत, ह्मणून कोर्टे अशी दत्तविधानें मंजूर कर- णार नाहींत. परंतु वडिलार्जित मिळकतीपुरती धर्मबाह्य पुत्राशीं वांटणी केल्यानंतर, बापानें दत्तविधान केलें असतां, तें दत्तविधान मृतलेखानें मिळकतीची व्यवस्था करण्या- १३. मि० मेन, कलम ९५; आवृत्ति ५. भला वि० परभु, इं० ला० रि० मुं० व्हा० २ पा० ६७. १४ राया वि० रामकृष्ण हा० छा० ठराव १८९४ पृ० १२१. १५ दत्तकमीमांसा, शौनकवचन, व्य० म० भाषान्तर भाग २ रा; पा० १६१. १६. फणींद्ररायकत वि. रामेश्वरदास इं. ला. रि. ११क. ४६३. १७. वेदांत व पुराणांत विश्वामित्रानें शुनःशेप दत्तक घेतला त्या वेळीं विश्वामिलाला शंभर पुत्र जि- बंत होते अशी कथा आहे. (ऋग्वेद संहिता १-६-२४ महाभारत आनुशासनिकपर्व अ००३ ) . १८. स्टील पा० ४८ १८३. १९. नागभूषण वि० शेषम्मा ई. ला. रि. ३ म १८०. हणमंत रामचंद्र वि० भीमाचार्य इं. ला. रि. १२ मुं. १०५.