पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. करण्याचें कारण नव्हते॑ अझा मुद्याविषयीं ठराव केवळ अभिप्रायाच्या स्वरूपाचा होय. शिवाय त्या कज्यांतील निवाड्यांतील ठराव तीन जड्जांचा आहे. त्यांपैकी दोन जडूजांनी आपल्या ठरावांत असे लिहिले आहे कीं, दत्तक घेणारी विधवा अल्पवयी असतां तिला फसवून खोट्या गोष्टी सांगून तिच्याकडून दत्तक घेवविला असे शाबीत आहे, एवढ्यावरून आह्मीं दत्तक रद्द करितों; नवऱ्याची परवानगी नसतां विधवा दत्तक घेऊं शकते की नाहीं याविषयीं येथे ठराव करण्याचें कारण नाहीं; तरी आमचें मत ती घेऊं शकते इकडे जास्ती कलतें: यावरून नवयानें दत्तक घेण्याची नाखुषी दर्शविली असतां विधवा दत्तक घेऊं शकत नाहीं असा ठराव आहे तो फक्त एका 'जड्जाचाच आहे, व त्याला दोन जड्ज अगदी प्रतिकूल नसले तरी अनुकूल तरी नव्हतेच. मला असे वाटतें कीं, मृत्युपत्रानें आपल्या धनाची व्यवस्था करण्याचा अधिकार प्रत्येकास आहे असें आतां निर्विवाद सिद्ध आहे," तेव्हां दत्तकाबद्दल स्पष्ट प्रतिषेध कोणी केला असतां त्याच्या विधवेनें घेतलेला दत्तक त्याच्या घनास अनधि- कारी व्हावा हे कदाचित् युक्त व्हावें. परंतु यापेक्षा जास्ती ठराव करण की तो दत्तकच रद्द, हे मला बरोबर दिसत नाहीं. मुलाचे उपनयनादिक नित्य संस्कार करूं नयेत, किंवा स्त्रीनें व्रतें महायात्रा इत्यादिक करूं नये असा स्पष्ट प्रतिषेध करूनं एकादा मृत झाला, तर त्या प्रतिषेधाला न मानितां केलेली सदरची कृत्यें अशास्त्र होणारच नाहीत; कारण शास्त्रांच्या आज्ञांप्रमाणे पुरुषाच्या इच्छेनें नियमन झाले पाहिजे. त्या आज्ञांविरुद्ध भर्ता हुकूम करील तर तो हुकुम उन्मत्ताच्या आज्ञेप्रमाणे मोजला जाऊन त्याचें उल्लंघन करणें हें रास्त होईल असा हिंदुधर्मशास्त्राचा सिद्धांत मला दिसतो. या नजरेने पाहतां नवऱ्याचा प्रतिषेध असतांही केलेलें दत्तविधान सर्वांशीं रद्द न होतां मृत बापाचें श्राद्धादिक करण्यास, व दत्तक घेणाऱ्या आईचें धन घेण्यास, व दत्तक बापाच्या तेवढ्या वंशजांचें धन वारशानें घेण्यास तो अधिकारी होईल असे दिसतें. वर सांगितलेल्या मुकदम्यांत दत्तविधान रद्द करण्याचा ठराव मान्य करण्याजोगा नाहीं असा माझा आशय नाहीं; कारण ज्या ज्या कार्यात किंवा व्यवहारांत लबाडी असेल तें तें कार्य किंवा तो तो व्यवहार रद्द समजावा असे मनुवचनांत स्पष्ट सांगितलेलें आहे.” तेव्हां विधिवेस फसवून दत्तक घेण्यास तिची कबुली काढिली होती असें शावीत झाल्यावर, ती तिची कबुली रद्द करणें भाग आहे. दत्तक घेऊं नये अशी आपसांत कबुली असून जरी कबूल करणारा घेऊं लागेल तरी घेऊं नये अशाबद्दल दाव्याचा निकाल होईपर्यंत ताकीद देतां येणार नाहीं.' १२ . १०. मुं० हा० रि० व्हा० ३ पृ० ६ (दि० अ० शा० ). ११. सदरचें मनुवचन व त्यावरील मयूखकाराची टीका भाग २ रा पृ० २४६ पाहा. १२. असूर वि० रतनबाई इं. ला. रि. १३ मु. ५६.