पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ श्राद्धादिक हे आहे, व या क्रिया घडण्यासाठीही पुत्र घ्यावयास सांगितलेले आहे. इत- क्यावरून दत्तविधान झालें होतें कीं नाहीं अशाबद्दल विवाद पडला असतां प्रथम दर्शनी दत्तविधान घडलें असें मानावें असें ह्मटले तर चालेल; परंतु उपनयनाप्रमाणें दत्तविधान हें अवश्य विर्धातील आहे असे मुळींच ह्मणतां येणार नाहीं. अवश्य विधींपैकी आहे असें असतें तर आपल्या मागें विधवेनें दत्तक घेऊं नये असा प्रतिषेध करितां आला नसता, व कोर्टात हुकुमनामा मिळवून विधवेला दत्तक घेणे भाग पाडता आले असते. परंतु दत्तक घेण्याचा प्रतिषेध करितां येतो, व विधवेवर, तिची इच्छा नसतां, दत्तक घेणे भाग पाडण्यासाठी फिर्याद चालावयाची नाही असे कोर्टानी ठरविले आहे. ९ ( ८३. ) प्रसंगोपात्त एवढे सांगणे येथे युक्त दिसतें कीं, सदरों मुंबई हाय कोर्टाच्या ७ व्या व्हालमांतील परिशिष्ट पा. १ यावरील ठराव सर्वांशीं मान्य होण्या- जोगा आहे की नाही याविषयी मला शंका आहे. त्यांत कज्जाचा सारांश ह्मणून म- थाळ्यावर जी टीप दिली आहे त्यांत असे लिहिलेले आहे की " ज्या ठिकाणी नवऱ्याने दत्तविधानाचा प्रतिषेध केला असेल त्या ठिकाणीं, किंवा दत्तक घेण्याचें नाकारिले असून संमति न दर्शवितां तो मृत झाला असेल त्या ठिकाणी, हिंदु विधवेला दत्तक घेतां येत. नाहीं, व तिजें घेतलेला दत्तक रद्द समजावा. " आतां कज्यांत स्पष्ट प्रतिषेधाचा पुरावा नसून, फक्त नवऱ्यानें ' माझी स्त्री आहे तेव्हां मी दत्तक कशाला घेऊं?' असें मरण- काली मटले होतें इतकेंच शाबीत झाले होतें. सबब प्रतिषेधाबद्दल जो शास्त्रार्थ लिहिलेला आहे, तो कोर्टाचा ठराव ह्मणून समजतां येणार नाहीं. ज्या मुद्याचा ठराव किंच पुत्रदानं नादृष्टार्थमिति स्पष्टमेव पुत्रप्रतिनिधीनांद्दुः क्रियालोपान्मनीषिणः इति वाक्ये क्रियालोपभ- यात्मकद्देतूपादानात् । काम्यकर्म वैकल्पिक व त्याचा न्यासही प्रशस्त अर्से खाली दिलेल्या आधारावरून समजेल भगवद्गीता अ० १७ श्लो० २. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः । सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ तात्तैराय आरण्यक प्रपाठक १० अनु० १० ऋक् २१ न कर्मणा न प्रजया धनेन त्यागने के अमृतत्त्वमान॒शुः ॥ अध्यात्मरामायण उत्तरकाण्ड अ० ५ लो० २१. सा तैत्तिरीयश्रुतिराह सादरं न्यासं प्रशस्ताखिलकर्मणां स्फुटम् । एतावदित्याइ च वाजिनां श्रुतिज्ञा- नं विमोक्षाय न कर्मसाधनम् ॥ २१ ॥ ९. पाहा बयाबाई वि० बाळा ऊर्फ व्यंकटेश मुं० हा० २० व्हा० ७ पारीशष्ट पा० १; बामनदास मुकरजी वि० मसामत तारिणी. मू० इं० अ० व्हा. ७ पा० १६९, १९०. उमासुंदरी वि० सौरोबिनी इं० ला० रि० क० व्हा ७ पा० २८८