पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. ७३ दत्तविधानाचे हेतु. 3 ( ८१.) दत्तविधानाचा हेतु पारलौकिक व ऐहिक असा दोन प्रकारचा आहे. पिण्डोदकदानावांचून मृताची उत्तम गति होत नाहीं असें धर्मशास्त्रांत सांगितलेले आहे ह्मणून और्ध्वदेहिक क्रियांचा लोप होऊं नये या इच्छेनें औरस नसतां पुत्रप्रतिनिधि करावे असें मनूनें सांगितलें आहे, तेव्हां क्रियालोप टाळणे हा दत्तविधानाचा पारलौ- किक हेतु होय. दुसरा ऐहिकं हेतु तो वंश व नाम यांचा अविच्छेद अथवा संतत चालणे हा होय. ४ E ( ८२ . ) दत्तविधान है नित्य कर्मातील आहे असा कित्येकांच्या ह्मणण्याचा रौंख दिसतो, परंतु त्या ह्मणण्यास कांहीं आधार नाहीं. दत्तक पुत्र हा औरसाच्या अभावीं सांगितलेला प्रतिनिधि आहे. औरस पुत्राच्या उत्पादनार्थ जो विवाहनामक संस्कार सांगितलेला आहे तोच जर वैकल्पिक आहे, तर मग दत्तविधान है नित्य कर्म ह्मणजे असे कर्म की जें न केल्याने प्रत्यवाय लागेल तसें आहें असें ह्मणणे बरोबर होणार नाहीं. आतां असे खरें आहे की, पुत्राची जी कर्तव्ये आहेत त्यांत पितरांचें 19 ३. अपुत्रानेंच दत्तक घ्यावा; तो पारलौकिक पिण्डोदकदान इत्यादि कारणांसाठी ध्यावा; परंतु जर बन्धु पुत्रवान आहे, तर पारलौकिकाचा निर्वाह बन्धूच्या पुत्राकडून होतो. याकरितां भ्रातृपुत्र अस तां, पारलौकिकासाठींच केवळ दत्तक घेणें तो घेऊं नये; तर आपल्या पत्नीच्याही पूर्वी आपल्या पिण्डदा- नाविषयीं आणि आपलें रिक्थ घेण्यासाठी कोणी अधिकारी असावा, अशी इच्छा असेल त्याणे दत्तक घ्यावा. संस्कारकौस्तुभ, दत्तकप्रकरण, प. ४३, पृ० १, पंक्ति ४, धर्मसिन्धु, परिच्छेद ३, पूर्वार्ध, प. १३, पृ० २, पंक्ति ५-७. ४. मनु० अ० ९ श्लो० १८०. ५. दत्तकमीमांसत मनुवचन ह्मणून श्लोक लिहिलेला आहे तो असाः- अपुत्रेण सुतः कार्यो यादृक्तादृक्प्रयत्नतः । पिण्डोदकक्रियाद्देतोर्नामसंकीर्तनाय च ॥ ६. पद्दा राजेंद्रनारायण वि. सरोदासुंदरी, स. वी. रि. वा० १५, पृ० ५४८, ७. नीलकंठार्ने संस्कारमयूखांत 'अत्र चोपनयनान्तानामावश्यकत्वं न स्नानादीनां, तेन यमिच्छेत्तमा- विशेद्ब्रह्मचर्यादेव प्रन्नजेदिति संगच्छते ' अर्से सांगितलेले आहे त्याचा सारांश मौंजीबन्धनापुढील सर्व सं स्कार कर्त्यांचे इच्छेवर आहेत. त्यांत विवाह येतो. ८. दत्तविधान में काम्य आहे असे पळणिटकरोपनामक देवभद्रदीक्षितपुत्र बाळकृष्ण यांनी केले- ल्या दत्तकमंजरी ग्रंथांत लिहिलेले आहे. तस्मादन्वयव्यतिरेकाभ्यां निरुक्तपिंडोदकक्रियाहेतुकः उक्तवाक्यैर्विहितः पुत्रप्रतिनिधिः काम्य एव। कामना चात्र जीवतो वाक्यकरणान्मतादे भूरिभोजनात् । गयायां पिंडदानाच त्रिभिः पुत्रस्य पुत्रतेत्या- दिवाक्यप्रतिपाद्यगुणशाळिपल्याद्यधिकारिभ्यः पूर्वाधिकारितां प्राप्स्यमानपुत्र प्रतिनिधिकर्तृकमद्घटितच- य्युद्देशकपिण्डोदकीक्रया भवत्वितीच्छारूपा ग्राह्या । अर्सेच निर्णयसिन्धूचे टीकाकार कृष्णंभट्ट यांनीही लिहिले आहे.