पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिन्दुधर्मशास्त्र. व्यवहारखण्ड, प्रकरण पहिलें. शास्त्राचे उगम. (१.) हिंदुधर्मशास्त्राचे तीन विभाग आहेतः आचार, व्यवहार, आणि प्रायश्चित. त्यांतून, व्यवहाराचा मात्र सांप्रत न्यायाच्या ठिकाणीं उपयोग होतो. आचार व प्राय- श्चित्त या विषयांचा निह लोक आपसांत करितात; कारण इंग्लिश कायद्यानें या बा- बतीत हात घालण्याचा अधिकार चालू कोडांतील न्यायाधीशांस दिला नाहीं. ' २ (२.) आतां, मानपान हा एक प्रकारचा लौकिक आचारच होय, आणि त्याच - द्दल फिर्यादी चालतात असा मूळच्या ठरावांचा ओघ होता. आतां पूर्वीच्या मानपा- नाच्या ठरावांत सांप्रत बदल पुष्कळ झाला आहे. त्यामुळे देशरिवाज अनुकूल असतांही पूर्वीप्रमाणे आतां दावे चालत नाहींत. 3. • साधारण परिपाठांत, व वस्तुतः पाहतांही, आचार ह्मणजे धर्मसंबंधींच आचार, व तो कायद्यावरून कोर्टाच्या हुकमतीस पात्र नाहीं. १. इ. स. १८२७ चा कायदा २ क. २१ र १ पहा. इ. स. १८८२ चा आक्ट १४, कलम ११ ही पहावे. २. मारिसचे सदर दिवाणी मालतीचे रिपोर्ट सन १८५७ वालम ४, पृ. ११८; स्पे. अ.नं. ३६७५. देहु जि. पुणे येथे तुकाराम बावांचे वंशज यांणी पूर्वी दह्याची हंडी प्रथम फोडण्याचा हक्क आपला आहे असा दावा आणिला होता व तो त्यांच्या वतीने फैसल झाला होता. पहा मुं. हा. रि. बा. ९, पू. ४१३. ३. ह्याचविषयीं मू. २१६, इं. ला. रि. १० ई. अ. व्हा. ३, पृ. १९८. ई. ला. रि. २ मुंबई पृ. ४७६, ई. ला. रि. ६ मुंबई मुंबई २३३.व ७ मद्रास ९१ हेही पहावे. परंतु ई. ला. रि. ११ मद्रास ४५० बांत विरुद्ध ठराव आहे.