पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशास्त्र. प्र० २ . लावतो. परंतु वधू परत त्याच्या कपाळी शेंदूर लावतांना आपले तोंड मार्गे फिरवीत नाहीं. मार्गे हात नेऊन शेंदूर लावते. हें झाल्यानंतर एक बंदूक सोडतात. नंतर पाण्याने भरलेली भांडी त्यांवर पालथीं करतात व वधुवरांच्या अंगावर पाणी सांडतात. नंतर ती तेथें तयार केलेल्या एका खोलीत वस्त्रे पालटण्यासाठी जातात व कांही वेळ तेथेंच राहतात; व जेव्हां तीं बाहेर येतात तेव्हां त्यांस लोक नवराबायको असे समजून नमस्कार करतात. (वा. १६, पृ. २८६). बोनाई नांवाच्या खंडणी देणाऱ्या संस्थानामध्यें भूया नांवाचे लोक आहेत त्यांची चाल :- • ते मुलास आजाचें नांव देतात आणि ते झाल्यानंतर विवाहापर्यंत कोठलेही विधि होत नाहींत, व तीं दोघेजणें वयांत येत त्तों विवाह होत नाहीं. दोघांच्या आईबापांना लग्न जमवण्यास फार त्रास पडत नाहीं. (वा. १७, पृ. १७१). मुआसिस् अथवा कुरु लोकांत खालीं लिहिलेला मुख्य विधि आहे:- एक भांर्डे पाण्याने भरून व एक दिवा लावून खांबाजवळ ठेवतात, व त्याजवळ एका भोंड्यावर ७ तांदूळांच्या व हळदीच्या पुंज्या करितात. जेव्हां सर्व तयार होतें तेव्हां मुलीकडील मुख्य करवली मुलीस व मुलाकड्रील मुख्य पाठराखणा मुलास त्या खांबावाटोळे एकदां फिरवितात व बाकीच्या प्रदक्षिणी त्यांकडून करवितात; व जेव्हां जेव्हां तीं त्या घोंड्याजवळ येतात तेव्हां तेव्हां वर वधूकडून एक एक पुंजी लाथेनें उडववितो. जेव्हां सातवी रास उडविली जाते तेव्हां मुलाकडील मुख्य मनुष्य खांबास धरतो व जोरानें त्यास हालिवतो ( तो खांब काठीसारखा रोवलेला असतो ) व नंतर “तें आटपलें" (विवाह आटपला) असे सर्व लोक ओरडतात. नंतर त्या दोघांस आंत नेतात व कांहीं वेळ एकत्र राहिल्यानंतर ती बाहेर येतात व जमलेली मंडळी त्यांस आपला आनंद प्रदर्शित करते. (वा. १७, पृ. १८६). मानभूमचे कुरनिस् लोकांची चालः– मुलीस सभेमध्यें आणतात, व तिचा भावी सासरा तिला द्यावयाच्या देणग्या आ- जतो. तिचा नवरा तेथें येतो. नंतर मुलीस तिच्या मैत्रिणी मोहाच्या झाडाजवळ नेऊन त्याच्याशी तिचा विवाह लावितात. त्याप्रमाणेच वराचा विवाह आंब्याच्या झाडाशीं होतो. मग एका पार्टीतून वधूस विवाहमंडपांत आणितात. वर तिच्या कपाळास शेंदूर लावतो व डोळ्यांच्या मध्यभागी एक लाल चिन्ह करतो व नंतर सर्व- जण "हरिबोलसिंद्रदान" असे ओरडतात. कांही ठिकाणी आपण दोघेंनणे रक्तानें व मांसानें एक झालों असें दर्शविण्यासाठी एकमेकांच्या अंगास रक्ताचे टिळे लावतात; व हेच सिंद्रदानाचें (सिंदूरदानाचें) मूळ असेल असे वाटते. नंतर त्यांमध्यें नवराबायको