पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयीं. पुष्कळ बायका करण्याची चाल आहे. जरं एखादा पुरुष मरून त्याच्यामार्गे पुष्कळ विधवा राहतील तर त्या आपल्या सख्ख्या दिरांस, अथवा चुलत दिरांस आपले नवरे करूं शकतात. सगळ्या एकाच्या बायका होत नाहींत, परंतु एकेक एकेकाची बायको होते. कोणी मनुष्य एखादी स्त्री जवळची आप्त असेल तर तिला आपली बायको. करूं शकत नाहीं. (वा० १४, पृ० २९८.) ह्या लोकांत लग्नाच्या वेळी भटाची जरूर लागत नाहीं. वधुवरांनीं एके ठि- काणीं भोजन करणे हाच मुख्य विधि आहे. ह्या कृत्याने मुलगी आपल्या बापाच्या गोत्रांतून तुटते आणि आपल्या नवऱ्याच्या गोत्रांत जाते.. ( वा० १४ पृ० ३१६ ). लोहारडगा परगण्यांतील बिरहोर लोकांची चाल:-- 66 त्यांचा विवाहसमारंभ अगदी साधा असतो. मुलगा मुलीस बलात्काराने पाठलाग करून पळवून नेतो. जेव्हां त्या दोघांचा विवाहाचा संकेत होतो, तेव्हां त्यांच्या घरची माणसें मेजवानीच्या तयारीस लागतात. उकडलेला डुक्कर, शिजविलेले माकड, चरबींत शिजविलेल्या वनस्पति, आणि कंदमुळे हे पदार्थ मेजवानीच्या उपयोगी पडतात. तांदुळापासून केलेलें मद्य अथवा ते नसेल तर खुल आणि खसुना नांवाच्या झाडांपासून काढलेले मद्य ते पितात. जेव्हां जेवण तयार होते तेव्हां दोहींकडील वहऱ्हाडी दोन पंक्तींत समोरासमोर बसतात. नंतर वराचा बाप माझा मुलगा चा- लण्यांत .चपळ आहे व मुलीस बोलावीत आहे" असें मुलीच्या बापास ह्मणतो, आणि मुलगी किती चपळ आहे हे दाखवायास सांगतो. हे झाल्यानंतर ती उठते आणि बा- पाची आज्ञा झाली ह्मणजे धांवायास लागते.. ती जंगलांत पळून जाते व कांहीं मि- निटांनंतर वर तोस धरावयास जातो. तो तिचा पाठलाग करीत असतां वन्हाडी गाणे गात अथवा गोष्टी सांगत बसतात, व अर्से चालले असतां एक मुलाच्या चपळ- तेची प्रशंसा करतो व दुसरा मुलीच्या चपळतेची. मुलगा आरोळी देईतों गाणे चालतें.. ही आरोळी मुलगी सांपडल्यानंतर तो देतो. नंतर सर्व स्तब्ध राहतात. नंतर जंगलांत जाऊन तेथें ताबडतोब विवाह लावतात, आणि मुलगी परत मंडळींत येऊन मिळाल्यानंतर बायका तिला नवी साडी नेसवतात. ही साडी नवरा तीस देतो. (वा. १६ पृ. २५८). लोहारडग्यांतील उरावण लोकांची चाल :- मुलीच्या घरासमोर एक डाहाळ्यांनी आच्छादिलेला मांडव घालतात व तेथें बायका वधुवरांस नेतात. एका नांगरावर धान्याच्या लोंबीवर एक घोंडा ठेवतात व त्यावर त्या दोघांस उमें राहावयास सांगतात. ह्या लो- कांत एका धोंड्यावर मुलीच्या पाठीमागें वर उभा राहतो, परंतु बायकांस श्रेष्ठत्व दिले असें वाटू नये ह्मणून तिच्या खोंटांवर हा उभा राहतो. नंतर वर मुलीच्या कपाळास शेंदूर