पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयीं. हे नातें जडते. हे झाल्यावर सर्व लोक त्यांस आपला आनंद प्रदर्शित करतात व दु- सऱ्या दिवशी प्रातःकाळी ती दोघेजणे नवऱ्याच्या घरी जातात. ह्या लोकांत विवाहाच्या वेळी भटाची जरूर लागत नाहीं, लग्न शुभप्रद होईल किंवा नाही ह्याविषयीं ज्योतिषास प्रश्न करतात; व चांगला दिवस कोणता ह्याविषयींही त्यास विचारितात. ह्याशिवाय ज्यो- तिष्याची अथवा ब्राह्मणाची जरूर त्यांस लागत नाहीं. (वा. १७, प. २९४ ). ओरिसा प्रांतांतील जुआंग लोकांची चाल :- ह्या लोकांत लग्नाचे विधि अगदी साधे असतात. दोघांच्या पक्षाकडील मित्र लग्ना- विषय सर्व करार ठरवितात; व हे करार एकमेकांच्या संमतीनें होतात. मुलाने मुलगी पसंत केल्यावर पुढे लिहिलेल्या वस्तु मुलीच्या घरी मुलाकडील माणसे मुलाच्या तर्फेनें देतात. मुलीच्या बापास एक बैल; मुलीच्या मामास एक बैल; मुलीच्या आईसक रुपया व एक वस्त्र. (वा. १९ पृ. २४० ). त्याच प्रांतांतील भूया लोकांची चालः - ह्या लोकांत प्रसिद्धपर्णे विवाह करणे हे मान्य आहे, परंतु तो विवाह अग साध्या रीतीनें होतो. जर एखाद्या तरुण मुलाची एखाद्या तरुण मुलीवर प्रीति जडली, तर तो आपल्या कांहीं मित्रांस तिजकडे बोलणे लावण्यास पाठवितो. जर ती कंबूल झाली तर एक दिवस नेमतात व मुलाच्या तर्फेनें तिजकडे एक भाताचें ओझें पाठवितात. वर आपण स्वतः मुदीच्या घरी जात नाहीं; परंतु त्याचे मित्र जातात व तीस आणि तिच्या मित्रांस घेऊन येतात. नंतर ती सर्व माणसें नाचर्णे, जेवर्णे, व भानंद यांत एक दिवस व रात्र घालवितात. दुसऱ्या दिवशी सकाळी वर वधूच्या मित्रांस प्रत्येकास तीन मापें भात व तीन मार्पे तांदूळ देतो व त्यांस जावयास सांगतो. हे झाले ह्मणजे सर्व विवाह- विधि आटपला. सामर्थ्य असल्यास पाहिजे त्याने आपणास पाहिजे तितक्या बायका कराव्या, परंतु कोणताही जुआंग अजून दोहोंपेक्षा जास्ती बायका केलेला आढळला नाही. ह्या लोकांत पुष्कळ जाती आहेत. (वा. १९, प. २४७). उत्तर हिंदुस्थान व राजपुताना राजपुतानग्याझेटीर वा० १ मध्ये खाली टिपलेले उतारे पाहावे. प० ६८-७० ( हे पुस्तक कलकत्त्यास छापलेले आहे.) यांत विवाहाच्या काम रक्तसंबंधार्चे अंतर कसे असावें याबद्दल चांगला कित्ता आहे. मामेभावंडांबरोबर विवाह होतो. ह्या जातींत अतिशय पोटतुकड्या झाल्या आहेत. नाभा लोकांतील लग्नें:-धाकटे भाऊ आपल्या वडील भावांच्या विधवांबरोबर अजमीर प्रांतांत लग्न लावू शकतात ( प० ८० ). बन्वरमध्ये सुद्धां पहा ( प० १२०-१२१). विधवा स्त्री पाहिजे त्या अन्य जातीय पुरुषांपाशीं जाऊं शकते. बापाच्या सजातीयांशीं