पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ नवें वस्त्र व मणगटोवर घालण्यासाठी शंखाचे केलेले गोठ देतात. वधुवरें एकमेकांस माळा घालतात. कांही दुसरा विधि नसल्यामुळे भटाची जरूर लागत नाहीं. तरुण सुत्रा- सिनी मुलीच्यापुढे चलनवत्ती ठेवितात. कनिष्ठ प्रतीच्या लोकांत असा विवाह क्वचितच होतो, परंतु उच्च जातीत फार आढळतो. अशा विवाहाची फार प्रतिष्ठा मानीत नाहीत, परंतु असा विवाह झाल्यास तो रद्द होत नाहीं. (२.) ब्राह्म विवाह:-- दुसरे ठिकाणी होणारा ब्राह्मविवाह आणि हा बहुधा सारखेच आहेत; परंतु पुष्कळ विधि गाळतात. कोठें कोठं सप्तपदीक्रमण • आणि विवाहहोम होत नाहींत. मुलीला एका पाटावर ठेवून नवऱ्याच्या सभोवती ७ वेळा फिरवितात. एक न्हावी तिच्या डो- क्यावर छत्री धरतो. (३.) विधवाविवाह:-- - हा विवाह करण्यास कोठलाही विधि लागत नाहीं. त्यापासून झालेल्या मुलांस बापाच्या इस्टेटीचे मालक मानतात. परंतु अशा मुलांस हिंदु लोक औरस मानीत नाहींत, आणि राजबनती लोकसुद्धां अशा मुलांस कमी मानतात. अशा विवा- हित विधवांस डांग्वा, धोका, पाशुआ, अशी निरनिराळी नांव देतात. डांग = काठी अथवा काठीनें दिलेला फटका. जेव्हां विधवा स्वतंत्र राहते, आणि एखादा मनुष्य एक काठी घेऊन तिच्या घरी जाऊन तिच्या छपरावर काठी मारतो, व दार उघडून तिला बळकावतो, तेव्हां अशा केलेल्या बायकोस डांग्वा अर्से ह्मणतात. परंतु अ- सा विवाह त्यांचा पूर्वीचा संकेत असेल तरच होतो. धोका = आंत शिरणे. जेव्हां एखादी विधवा एखाद्याच्या घरांत आपण होऊन शिरते, तेव्हां तिला धोका ह्मणतात. पाशुआ अथवा पाश या शब्दाचा अर्थ, नंतर. एकदां पूर्वी विवाह झालेल्या स्त्री- चा जेव्हां नंतर स्वीकार करितात तेव्हां तिला पाशुआ असे ह्मणतात. पाशुआ विवाह ह्मणजे विधवाविवाहाचे दुसरे नांव असे ह्मटलें तरी चालेल. (वा० १० पृ००३७७). सांतळ लोकांची चाल :- विवाहाच्या दिवशी मुलगा मुलीच्या घरी मंडळीसहवर्तमान जातो. तेथें. त्यांस हातऱ्यांवर बसवितात. कांहीं फराळानंतर मुलीचा बाप मुलीचा हात उचलतो व व- राच्या हातावर ठेवतो, व त्यानें तीस ममतेनं वागवावें ह्याविषयी त्याची प्रार्थना करतो आणि त्यास आपली मुलगी देतो. वर आपल्या करंगळीने तिच्या कपाळावर शेंदूर लावतो आणि तिच्या करंगळीत आपली करंगळी अडकवून तीस आपल्या घरी नेतो.