पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयीं. लागतात; परंतु त्यांची आईबापे विवाहास आडकाठी घालतात. असे झाल्यावर जर तो जोडपा पळून जाईल तर मुलीच्या बापास त्या मुलाजवळ मुलगी परत मागण्याचा अधिकार आहे, व मिळाल्यास तीस आपल्या घरीं तो नेऊं शकतो. जर तो तीस न देईल व तिच्या खुषीनें तीं दोघेजणे पुन्हां पळून जातील, तर त्यांस प्रतिबंध करण्याचा अधिकार कोणास राहत नाहीं. (वा. ६, पृ. ४७. ) जर कोणी मनुष्य दुसऱ्याच्या बायकोला घेऊन पळून जाईल, तर त्याणें तिच्या पहिल्या नवन्यास लग्नांत झालेला सर्व खर्च दिला पाहिजे, व शिवाय ४० अथवा ६० रु. दंड भरला पाहिजे. घटस्फोट करितां येतो; व अर्से करावयाचें झालें ह्मणजे गां- वांतील वृद्ध मनुष्यांची सभा होते व अपराध्यास अतिशय दंड होतो. (वा. ६ पृ. ४७.) चित्तागांगमधील टिपरांतील लोकांची चाल:-- लग्नाच्या वेळी अरण्यांच्या व नद्यांच्या देवतांस एका डुकराचा बळी देतात. मुलीची आई एक दारूनें पेला भरते, व तो मुलीच्या हातांत देते. ती आपल्या नव- ज्याच्या मांडीवर बसून अर्धा आपण पिते व अर्धा त्यास देते; नंतर ती आपली बोटे मोडतात व इतकें केलें ह्मणने विधि आटपतो. गांवांतील वृद्ध मनुष्यांस अर्ज केला ह्मणजे घटस्फोटाची परवानगी मिळते; मात्र योग्य कारणे दिली पाहिजेत. (वा. ६. पू. ५२. ) चित्तागांगमधील कुमीस लोकांची चाल:--ह्या लोकांमध्ये एक मोठी मेजवानी दिली ह्मणजे झाले. दुसरे कांही विशेष करावें लागत नाहीं. (वा. ६ पृ. ५९.) लुशै अथवा कुकी लोकांमध्येः-- ह्या लोकांमध्ये लग्न ह्मणजे एका प्रकारचा एक करार आहे असे मानतात. तो करार पाहिजे तेव्हां दोघांची खुषी झाल्यास मोडतां येतो. लग्नसमारंभाच्या वेळीं फक्त मेजवानी व नाच होतात. ( वा० ६ पृ० ६१ ). नौकाला प्रांतः -- चांडाळ, न्हावी, परीट, कोळी, आणि चांभार ह्यांत विधवा विवाह होतो. हे वि वाह परस्परांच्या खुषीनें होतात व विधि कांही लागत नाहीं; परंतु जरी ह्यापासून बहि- प्कार होत नाहीं, आणि जरी त्याची मुलें औरस मानिली जातात, तरी असे विवाह क चितच होतात. (वा० ६ प० २८२ ). डा० हन्टर १० व्या व्हालुम्मध्ये कुचबहार- मधील कोच अथवा राजवंशी लोकांच्या लग्नसंबंधी आचारांचें वर्णन करितोः- ( १. ) गान्धर्वविवाहः- ह्या विवाहाच्या वेळी पूर्वी सांगितलेली चलनवत्ती. मुलीच्यापुढे ठेवतात. तिला एक