पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ प्रतीच्या श्रोत्रियाच्या मुलीशी लग्न करील, तर त्याची पायरी कमी होत नाहीं. ज़री कनिष्ठ प्रतीच्या श्रोत्रियाशीं अथवा बनसजापाशी लग्न केलें, तरी त्याचा कुलीनपणा जात नाहीं, तरी त्याची प्रतिष्ठा कमी होते. कुलीन आपल्यास पाहिजे तितक्या बायका करूं शकतो. एका कुलीनाच्या १०० बायका होत्या आणि त्याच्या तीन मुलापैकी प्रत्येकास अनुक्रमे ९०, ३५ व ३० बायका होत्या. जे कुलीन पुष्कळ बायका करावयाचा धंदाच पतकरतात ते त्यांचें व मुलांचें उदरपोषण स्वतः करीत नाहीत; परंतु तो खर्च सासऱ्यांवर टाकितात. तथापि मुली झाल्यास त्यांस देणग्या देणें त्यांस भाग पडतें. मुलांस बापाची पदवी प्राप्त होते, व मुलीस आईची, व त्यांचा योग्य रीतीनें विवाह करून देण्यास पुष्कळ खर्च येतो. परंतु मुलींस देण्याची थोडक्याच कुलीनांची शक्ति असते, ह्यामुळे बनसज स्त्रियांपासून उत्पन्न झालेल्या पुष्कळ मुली अविवाहित राहतात. ( वालम ५, पृ. ५५ . ) " बंगाल्यामध्ये काँहीं वैष्णवांतील लग्नाची चाल:-- मुलांच्या अथवा मुलींच्या तो- ट्यामुळे पुष्कळांस अविवाहित राहावे लागतें. दुसन्या जातीतल्या विधवेबरोबर अथवा स्त्रीबरोबर एखादा प्रीतीनें जेव्हां गुंततो, तेव्हां त्यास इतरांपासून पुष्कळ त्रास भोगावा लागतो, आणि जेव्हां त्रास होत नाही तेव्हां तीं वैष्णव होतात व लग्न करितात. त्यांचा विवाहविधि अगदीं साधा असतो. वधुबरें परस्परांस माळा देतात; नंतर आ पल्या गोस्वामीस अथवा उपाध्यायास दक्षिणा देऊन सामर्थ्याप्रमाणे आपल्या शेजारच्या वैष्णवांस भोजन घालतात. वालम ५, पृ. १७ ) सोंवळा ह्म- चित्तागांगमधील टेंकड्यांत राहणाऱ्या चकमास लोकांच्या चाली:-- वर मंडळीसह वधूच्या घरी येतो. घरांत प्रवेश झाल्यानंतर वधुवरें चौरंगाजवळ बसतात. त्या चौरंगावर केळीच्या पानांवर आंडी, मिठाई, वगैरे जिन्नस ठेवतात. वराकडील पाठराखणा पुरुष ( त्यास णतात ) वराच्या पाठीमागें बसतो, व मुलीकडील पाठराखी बायको ( सोंवळी ह्म. ) मुलीच्या पाठीमागें बसते. ही दोघेंजणें वधूवरांच्या सभोवती एक मखमालीचें कापड बांधून सर्वांस " आपणास हा विवाह पसंत पडतो काय ? " असे पुसतात. नंतर ते “ त्यांस बांधा, त्यांस बांधा, " असे सर्व ओरडतात. नंतर तीं वधुवरें एके ठिकाणीं जेवतात, बायको नवन्यास घांस देते, व नवरा बायकोस घांस देतो. नंतर एक वृद्ध मनुष्य त्यांवर नदींतील पाणी शिंपडतो, तीं बायको व नंवरा झाली असे सांगतो, व वांझोडेपणा येऊं नये ह्मणून एक मंत्र ह्मणतो. ( वां. ६, पृ. ४७. ) आणखी एखादे वेळी असें होतें कीं, एक मुलगा व मुलगी परस्परांवर प्रीति करूं एका लहान फळफळावळ