पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवाहाविषयों. विवाहास योग्य व्हाषयाच्या पूर्वीच मुलीस एका तरुण पुरुषास देतात. लग्नाच्या दिवशों एक मनुष्य सर्व कुलूवार लोकांच्या घरी त्यांस आणावयास जातो, त्यांच्या देखत विवाह होतो, आणि वर, त्या सर्वांस एक डुकराची आणि दारूची मेजवानी देतो. प्र० २ नायकार लोकांविषय पृ० ( ५४ ) :- ह्या जातींत पुरुषांनी आपल्या बहिणींच्या मुलींबरोबर ह्मणजे भाच्यांबरोबर लग्न करावें असा नियम आहे. यामुळे वयाच्या संबंधाने अति फरक असतांही लग्न होतें. केव्हां केव्हां मुलगी अगदी लहान असते आणि नवरा अंगदी मोठ्या वयाचा असतो. क्वचित् व्युत्क्रमस्थिति असते. रड्डी लोकांविषयीं (पृ० १९ ):-- हे लोकही नायकर लोकांप्रमाणे आपल्या भाच्यांशी विवाह करितात. लग्ना विषयीं काल नियमित नसतो; परंतु हमेशा मुलीस ऋतु प्राप्त झाला ह्मणजे लग्न होतें. विवाहाचा निश्चय झाला ह्यणजे दिवस चांगला. कोठला हें ज्योतिष्यास विचारितात; आणि तो निश्चित झाला ह्मणजे सर्व तयारी करण्यासाठी मुलीच्या सग्यांस निरोप पाठवितात. ( पृ० ६२) टीप:--ह्या जातीमध्ये आणि नायकर जातीमध्येही पुष्कळ बायका करण्याची अति वाईट चाल चालू आहे व ती त्यांच्या कायद्यास अनुसरून आहे. एक काली दोन बहिणी एका पुरुषाच्या बायका झाल्या आहेत असे पुष्कळ आढळतें. एका मनुष्यानें तीन बहिणी आपल्या बायका केल्या आहेत असे मला माहीत आहे. कोलियारपुलार लोकांविषयीं (पृ. ६८):-

- ह्या लोकांत ७ जातिभेद आहेत; आणि

एका विभागांतील मनुष्य त्याच विभागांतील मुलीस बायको करूं शकत नाहीं; कारण त्या विभागांतील सर्व मुली आपल्या बहिणी आहेत असे मानितात. हिंदुस्थान:- नर्मदेचा उत्तर भाग. बंगाल [हन्टरकृत गाझेटीअर, वालमें २०, यांतील माहिती पुढील उताऱ्यांत घेतली आहे. ] कुलीन कुटुंबाचा इतिहास दिल्यानंतर हंटर साहेच लिहितात. धाका जिल्ह्यांत लग्नासंबंधी हरकती कशा उत्पन्न झाल्या, आणि लग्नासंबंधी मुकत्यार देवीसिंगनें कुलीनांच्या निरनिराळ्या प्रती कशा लावल्या आणि राडी कुलीनांचे ३२ विभाग कसे केले ? जे कुलीन आपल्या मुली श्रोत्रियांस अथवा कुलीन नसणाऱ्यांस देतात त्यांची एक पायरी कमी होते व त्यांस वंशज ह्मणतात; आणि जे ह्या ब्राह्मणांच्या मुली करतात त्यांची एक पायरी चढते व त्यांस भंग ह्मणतात. जर एखादा कुलीन उच्च-