पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २. १९. भूतालंपांडय असे सांगतो कीं, पदार्थ अथवा होरपोदवाळु जातींतल्या मुलींस जर पुरुष त्याच जातीचा अथवा उच्च जातीचा असेल तरच मात्र, उडिगे (विवाहांत दिलेले वस्त्र ) दिल्यानंतर त्यापाशी राहू द्यावें. १६. अरसंमध्ये ( राजे लोकांत ) ब्राह्मणांच्या रीतीप्रमाणे विवाह केला तरी कां- ही अडचण नाहीं. ज्याअर्थी अरसूपासून उत्पन्न झालेल्या मुलांस हमेशा देणगी दे- तात त्याअर्थी भूतालपांड्य असें सांगतो कीं, विवाहविधि खांब पुरून, भांडी ठेवून केला असतां बरें. जर त्या अरसूंमध्ये कोणास देणग्या देण्याचे सामर्थ्य नसेल, तर ब्राह्मणाप्रमाणं विवाह करतां येणार नाहीं. चौटे व बौगिरा लोकांमध्ये शुभा- शुभ सर्व आचार ब्राह्मणांच्या रीतीनेंच होतात, असेही भूतालपांडयानें सांगितले आहे. कस्कृत दक्षिण देशांतील लग्नांसंबंधी माहिती [ मद्रास १८७५ ] ह्या पुस्त कांतून उतारेः– मारावर लोकांविषयीं:-- अति गरीब मारावर लोकांमध्ये फार थोडके किंधि केले जातात; फक्त नातेवाई- कांचें एक जेवण होर्ते, मानवरीवर वधुवरांस ठेवितात, आणि वराच्या बहिणीकडून थाळा बांधवितात. इतकें आटपलें ह्म० विधि संपला. • वराच्या आईच्यासंबंधाच्याच मुली बायका केल्या जातात. बापाच्या आप्तविषयी मुली चालत नाहीत. बापाच्या आप्तवि- षयी मुलींपेक्षां परकी मुली पसंत पडतात. कुरावेड लोकांविषयीं:- जेव्हां काडी तोडतात तेव्हां लग्नाच्या वेळी दिलेली देणगी परत दिली पाहिजे, आणि जो कोणी तितका पैसा देऊं शकेल तो त्या स्त्रीस आपली बायको करूं शकेल. ह्या जातींमध्ये मुले जन्मावयाच्या अगोदरसुद्धां त्यांचा विवाह करून टाकितात. आ पल्या मुलांचे असे विवाह करण्याची दोघांस इच्छा झाली, ह्मणजे एक दुसऱ्यास ह्मणतो “ जर तुझ्या बायकोस मुलगी होईल, आणि माझ्या बायकोस मुलगा होईल अथवा व्यु- त्क्रम होईल, तर त्यांचा विवाह झाला पाहिजे;" आणि हा करार न फिरे असे करण्या- साठीं ते एकमेकांस तंबाकू देतात; व मुलाचा बाप मुलीच्या नातेवाईकांस दारूची अथवा ताडीची मेजवानी देतो. परंतु मुले मोठी झाल्यावर एखादा ब्राह्मण असें सांगेल कीं " दुश्चिन्हें दृष्टीस पडत आहेत, " तर विवाह होत नाहीं आणि मुलीचा बाप मेज- वानीचा खर्च मुलाच्या बापास परत देतो. कुलूवड लोकांसंबंधीं (पृ० १०.):-