पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयीं. तर त्या मुलीस व तिच्या दारास दंड करावा; व जर तो जार उच्च जातींतला असेल तर त्याच्या स्वाधीन तीस करावें; व जर तो नीच जातीचा असेल तर तिचा त्याग करावा. ७. जर एखादी मुलगी विवाहाच्या पूर्वी ऋतु प्राप्त झाल्यावर दुसऱ्याबरोबर पळून जाईल, तर तिचा विवाह त्याच्याबरोबर जर तो तिच्याच जातीचा असेल तर करावा. जर नीच जातीचा असेल तर तिचा त्याग करावा, व उच्च जातीचा असेल तर ती त्याच्या स्वाधीन करावी. . ८. जर एखादी विवाहित स्त्री आपल्या नवऱ्यास सोडून देईल व दुसऱ्या आप- ल्याच जातीच्या पुरुषाबरोबर पळून जाईल तर तिचा त्यांच्याशीं विवाह होऊं द्यावा. जर तो दुसरा पुरुष तिच्याहून उच्च जातीचा असेल तर त्याच्याबरोबर तीस राहूं द्यावें; व नोच जातीचा असेल तर तिचा त्याग करावा. ९. क्षत्रिय जातीच्या मुलीच्यासंबंधानें क्षत्रिय जातीचेच नियम पाळावे. क्षत्रियां- मध्यें व ब्राह्मणांमध्यें कैधार रीतीनें विवाह होऊं शकतो (ह्म० उदक सोडून लग्नांत मुलीस देणें ). पुरुष जर त्याच जातीचा असेल अथवा नीच जातीचा असेल तर तिचा त्याग करावा. १०. जैन जातींत चाल अशी आहे कीं, जर पुरुष स्त्रीच्याच जातींचा असेल तर मुलीस त्याच्या स्वाधीन पाहिजे असल्यास करतात, परंतु जर तिचा उच्च किंवा नीच जाती- च्याशीं गैरशिस्त रीतीनें संबंध झाला तर तिचा त्याग करतात. ११. मालवर जातींतील स्त्रियांविषयीं असें आहे कीं, जर पुरुष समान जातीय अथवा उच्च जातीय असेल तर तीस त्याच्याजवळ राहूं देतात, व नीच जातीचा असेल तर तिचा त्याग करतात व परत कधीं तीस पुनः घरी बोलावीत नाहीत. १२. भूतालपांड्य सांगतो कीं, नायमिनार व नायर ह्या दोन जातींत, एकच कन्याकल्याण मात्र आहे, ह्मणजे कुमारिकांचें मात्र लग्न होतें, आणि स्वयंवर ह्मणजे मुलीनें आपण पुरुष निवडून त्याशी लग्न लावणे होत नाहीं; परंतु पुढें जर कोणी त्याच जातीचा अथवा ब्राह्मणासारख्या उच्च जातीचा पुरुष मुलीस बाळगील तर तीस त्यास बहुधा बाळगूं द्यावी. १३. कुमारबल्लाळ लोकांत आणि कदम्ब जातींत, जर कोणी उच्च जातीचा ह्म० ब्राह्मण किंवा क्षत्रिय तीस बाळगील तर तीस त्याच्याकडे राहूं द्यावी; व नीच जातीचा असेल तर तिचा त्याग करावा. १४. स्थानिक आणि अम्बलवासी लोकांत जर पुरुष त्याच जातीचा नसेल अथवा ब्राह्मणाहून नीच जातीचा असेल तर त्याग करावा.