पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. हिन्दु धर्मशास्त्र. प्र० २ २. जर एखाद्या अलयसंतान कुलांतील मुलीचा नवरा मेला तर तीस बुडवळती असें ह्मणतात. जर ती उडगे ( विवाहवस्त्र ) मिळावयाच्या अगोदर दुसऱ्या कोणत्या आपल्या जातीच्या पुरुषापासून गर्भ धारण करील तर तीस त्या पुरुषास ( बोडधार ) नांवाच्या विवाहविधीनें त्यापासून दंड घेऊन द्यावी. भूतालपांड्य असें ह्मणतो कीं, जर स्त्रीचा प्रिय उच्च कुळांतील असेल तर तीस बाळगण्याची परवानगी त्यास द्यावी; परंतु जर तो नीच कुळांतील असेल तर बल्लाळानीं त्या पुरुषापासून दंड घेऊन त्याला तीस विकत द्यावें. ३: जर एखादा नवरा आपल्या स्त्रीस. मार्गे ठेवून परदेशास जाईल तर भूतालपांड्य असे सांगतो कीं, तीस पांच वर्षे भरल्यानंतर उडिगे ( विवाहवस्त्र ) देऊन दुसऱ्या पुरुषास द्यावें. आणि तो असे सांगतो की, जर ती नवऱ्याच्या पश्चात् ( नवरा बाहेर देशीं गेला असतां) गरोदर राहील तर तिच्या जाराजवळ तीस राहू द्यावें; व अलें कर- तांना जर तो उच्च जातींतील असेल तर कांही दागिने तीस द्यावे; आणि जर समान जातींतील असेल तर वस्त्रे द्यावीं; जर नीच जातींतील असेल तर तीस दंड करावा, तिचा त्याग करावा, व ती नीच जातींतील झाली असे समजावें. ४. जर अशा स्त्रीस तीन अथवा चार मुले विवाहापासून झाल्यावर तिचा नवरा परदेशी जाईल, तर तिचे लग्न पुन्हां दुसऱ्या पुरुषाबरोबर होणार नाहीं. जर असे असतांही समान जातीय पुरुषाबरोबर तिचा संग होईल, व नवरा परत यावयाच्या पूर्वी गर्भधारण होईल, तर तिचा पुनर्विवाह होणार नाही. जर तो परपुरुष नीच जातीचा असेल तर तिचा त्याग करावा ( तिला बहिष्कृत करावी ). ५. भूतालपांड्य खाली लिहिलेला एक नियम करतो:-- जर आपला नवरा जारकर्म करणारा आहे असे एखाद्या विवाहित स्त्रीस कळून येईल व त्यासही आपली स्त्री जार- कर्मी आहे असे कळून येईल, आणि तो जर तिला घेईल आणि तिच्या वडिलांच्या स्वाधीन करील तर ती दुसऱ्या पुरुषांबरोबर लग्न करूं शकेल. जर एखादा मनुष्य पहिली स्त्री अंसतां दुसऱ्या स्त्रीस बाळगील आणि पहिल्या स्त्रीचे हाल करील, तर पहिल्या स्त्रीचे आईबापतीस आपल्या घरीं परत बोलावून तिचा अन्यपुरुषाबरोबर विवाह करून देऊं शकतील. जर एखादा नवरा आपल्या स्त्रीचा छळ करील ( तिला मारील अथवा शिव्या देईल ) तर त्याची समजूत तीन अथवा चार वेळां करावी; परंतु जर त्यांमध्ये पुन्हां बिघाड होईल तर तिचे आईबाप तीस परत बोलावूनं तिचा अन्य पुरुषाबरोबर विवाह करूं शकतील. ६. जर एखाद्या मुलीला ऋतुप्राप्ति होईल व ती विवाहाच्या पूर्वी गर्भार होईल,