पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५९ विवाहाविषयीं. प्र० २ तो तिच्या आईबापांस १६ पासून ५० रुपयांची देणगी देऊं शकेल, तर कांही अडथ- का होत नाहीं. जर बायको नवन्यास टाकून देईल आणि दुसन्याजवळ जाऊन राहील, तर तो पहिल्या नवन्यास १६ पासून ६० रु० देतो, परंतु जर नवरा आपखुषीनें बा- यकोस सोडून देईल, तर त्यास कांही मिळत नाहीं. विधवा दुसरे लग्न करूं शकते. त्यावेळी कांहीं विधि होत नाहीं. नवरा तीस १ चोळीलुगडे देतो, तिच्या घरी जातो, आणि तीस घेऊन जातो. परंतु हे रात्रीस केले पाहिजे; कारण ती दिवसास लग्न करील तर गांव दग्ध होईल असा त्या लोकांचा समज आहे. एक मनुष्य एकदम एकापेक्षा जास्ती बायका करूं शकतों. नायकड़े लोक त्या जातीशीं विवाह करीत नाहींत. परंतु जर एखादी कोळीण नाईकड्याबरोबर लग्न करील, अथवा कोळी नाई- कडा स्त्रीबरोबर लग्न करील तर त्यांस नाईकडे आपल्या जातींत घेतात." ( वरील ग्रंथ पृ० २२४-२२५ ) मद्रास इलाका- नायर लोक दहाव्या वर्षाच्या आंत लग्न करितात; परंतु नवरा बायकोबरोबर कधी रहात नाहीं. तो तिला तेल, वस्त्र, दागिने, अन्न वगैरे पुरवितो; परंतु ती आ- ईच्या घरी अथवा ती मृत असल्यास भावांच्या घरी वास करिते, आणि पाहिजे त्या आपल्या योग्यतेच्या पुरुषाबरोबर संग करिते. ह्यामुळे कोणत्याही नायरास आपला बाप माहीत नसतो, आणि प्रत्येक मनुष्य आपल्या बहिणीच्या मुलांस आपले वारस असे समजतो. ( ह्यामिल्टन्कृत हिंदुस्थानचा इतिहास, वालम २, पृ० ४१०--४१२ः बुक्यानन्चा प्रवास, वा० २, पृ० ४१० - ४१२; यांचे इतर जातींवर परिणाम, तोच ग्रंथ पृ० ४२३ – ४२७ पहा. ) - मलबार इत्यादि. खालीं लिहिलेल्या १६ नियमांवरून अशा तऱ्हेच्या लग्नासंबंधी बरीच माहिती मिळेल. हे नियम भूताल पांड्याच्या अलयसंतानाच्या कायद्यांतून तर्जुमा करून घेतलेले आहेतः -- अलयसंतानसंबंधीं सोळा नियम. १. मुलगी नवऱ्याकडे गेल्यावर वंश कसा चालेल ह्याविषयी प्रश्न निघाल्यास त्याचा निर्णय असा कीं, आईबापांस आपली मुलगी ( दुसन्यास) लग्नांत देण्याचा अधिकार नाही; परंतु तो अधिकार तिच्या मामास व त्या घराण्यांतील मनुष्यास आहे. उदक सोडून कन्यादान करण्याचा अधिकार आईबापांस नाहीं; परंतु ते त्या उदकाच्या भांच्या स्पर्श करूं शकतील.