पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ परवानगी आहे. परंतु ब्राह्मण वगैरे जे यज्ञोपवीत धारण करतात ते ह्याचा निषेध करतात; व तसे करणान्यास जातीबाहेर टाकतात. नीच जातीत घटस्फोटाचा प्रकार आढळतो. गुजराथेंत पंचमहालांत भिल्ल लोकांची लग्ने:-- -- 66 - वर, वधूच्या घरी गेला ह्मणजे पुढील विधि करतातः-- आई मुलीस आणते व वराच्या समोर बसविते. त्यांचे हात जुळवितात, आणि वस्त्रांच्या टोकांस गांठी देतात. तीन बायका गाणे ह्मणतात; व वधूवरें, मांडवाच्या मध्यभागी ठेवलेल्या झाडास बारा प्रदक्षिणा घालतात. हे झाल्यानंतर वधूवरें एकमेकांस गव्हांच्या पोळांचे काकवी- बरोबर घांस देतात. - 66 पुनः तोच ग्रंथकार “ पहिली बायको जिवंत असतां नवरा दुसरी अथवा पाहिजे असल्यास तिसरीही बायको करूं शकतो. नवरा मेला असेल तर मात्र त्याची बायको दुसरा नवरा करूं शकते. पहिल्या नवन्यास जर ती नाखूष झाली, तर ती आपणास जो दुसरा पुरुष इष्ट असेल त्याकडून पहिल्या नवन्यास लग्नांत व लग्नापासून तिज- संबंधी झालेला खर्च देवविते. नंतर त्या दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करूं शकते. पहिल्या नवन्यापासून झालेली मुले आपल्या बापाजवळच राहतात. जर एखाद्या भिल्ल मुलाची आणि मुलीची लग्न करण्याची इच्छा होईल, आणि जर त्यांजवळ चालीप्रमाणे ७० रुपये नसतील, तर तिच्या संमतानें, एखाद्या जेवणावळीच्या अथवा जत्रेच्या वेळी तीस पळवून नेण्याचें तो ठरवितो. ती त्याजजवळ बायकोच्या नात्यानें राहते; आणि जेव्हां तिचे आईबाप तिच्या शोधार्थ येतात तेव्हां तिचा नवरा ७० रु- पयांचा भरणा हप्त्यानें भरून देण्याचे ठरवितो.” (क्यांपूबेलचा ग्याझेटीर वा० २३, पृ० २२०-२२१.) नैकडा कोळ्यांची लग्ने ( पंचमहाल ):-- वधुवरांस भोजनानंतर समोरासमोर आंगणाच्या अथवा मंडपाच्या मध्यभागी व सवून दोहींकडील वृद्ध मनुष्यें उपाध्यांच्या नात्यानें त्यांचे हात जुळवतात व वस्त्रांस गांठ मारतात. त्यांच्या डोक्यांवरून एक वस्त्र धरतात, व त्यांना वृद्ध मनुष्ये गुळाचे व कणकेचे लाडू देतात. प्रत्येकानें एकमेकांस दोन दोन घांस दिल्यावर वस्त्र काढून टाकतात; आणि असें झालें ह्मणजे लग्नविधि आटोपतो. कांहीं कांही प्रसंगी हा विधि मुळींच करीत नाहीत. 66 कोणी मुलगी जर १६ वर्षांच्या वयाची होऊन गेली, आणि ती मुलगी अविवाहित राहील तर तिनें आपल्या पसंतीस येईल त्या इसमाबरोबर जाऊन रहावें; आणि जर