पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २.. विवाहाविषयीं. • (१८६९). वधूवरांच्या वस्त्रांस गांठ मारून एका काठीला सात प्रदक्षिणा त्यांजकडून घालविल्या ह्मणजे विवाहविधि आटपतो; प. ५२. विधवाविवाह प्रायशः सर्वत्र चालू. जबलपूर:--

-- नेम्भार्ड व रसेलकृत ह्या प्रान्तांतील सेटलमेन्ट रिपोर्ट ( १८६९).

विवाहित स्त्रीची व रांडेची मुले सारख्याच योग्यतेचीं माननात; पण जर ती एकाच जा तीची असतील तर मात्र, एरव्हीं नव्हे. धाकट्या भावाच्या विधवेबरोबर लग्न लावतात; पृ. २५. मुंबई इलाका. ह्या इलाख्यांतील कांहीं चालीविषयी माहिती:-गुजराथेंत नातें माहीत असेल ते- व्हांच मात्र गोत्रसंबंध मानतात. परंतु असे सांगतात की, ब्राह्मणांतील कांहीं पोटजातींत जेव्हां माणसांची संख्या वाढत नाही तेव्हां अनुरूप विवाह होत नाहीत. झाले तरी फार थोडे व कांहीं ठिकाणीं आईच्या बाजूनें नातें इतकें दूर्लभ झाले आहे कीं, पहिल्या पिढीचीं व दुसऱ्या पिढीची चुलत भावर्डे ह्यांत एकमेकांशी विवाह होतो. जर तिसऱ्या पिढीपर्यंत संबंध पोंचत नसेल तर कनिष्ठ जातींत विवाह होतो. आंदण (देणग्या) देण्याच्या संबंधानें निरनिराळ्या चाली आहेत. मुलीच्या बा- पार्ने आंदण देगें अप्रतिष्ठित मानतात. हैं ( आंदण देणें) दक्षिणेंत प्रसिद्ध आहे. परंतु ही चाल उच्च प्रतीच्या लोकांत फार आढळते. ह्यासंबंधानें सर्व करार मुलाचा बाप मोठ्या निर्लज्जपंणानें मारवाड्यासारखे ठरवून घेतो. दुसरी चालः -- परत वेल ( एकदां मुलगी घेणें व त्या कुळांत आपली मुलगी देणे ) या लग्नास सावूं ह्मणतात. हलक्या प्रतीच्या कुटुंबांतून मुलगी मिळविण्यासाठी व पैसे वांचविण्यासाठी असे करतात. हे ब्राह्मण, वाणी, कुणबी इत्यादिकांत आढळते. ह्या प्रतीच्या लग्नांत, अ आपली मुलगी बस देतो व ब एक मुलगी अस देतो. जर बस मुलगी नसेल, तर तो आपल्या भाऊ, बहिणी, वगैरेची मुलगी देतो. तीन कुळे एक- दम आपापसांत संबंध करूं शकतात. अ आपली मुलगी कच्या मुलास देतो. क. आ- पली मुलगी अच्या मुलास देतो. ह्या लग्नास तराखलू ह्मणतात; व चार कुळांचा संबंध झाला असेल तर त्यास चोकडू ह्मणतात. द्वितीय विवाहाच्यासंबंधाने पुढील प्रकार आढळतो:-द्वितीय विवाह करण्यास बहुधा सर्व हिंदु पुरुषांस परवानगी आहे. परंतु कांहीं उच्च स्थितींतल्या व उत्तम स्थितीतल्या कुळांत व जेथें पहिली बायको मरते व वांझ निघते तेथें द्वितीय विवाह फार आढळत नाहीं. स्त्रियांनी द्वितीय विवाह करावा किंवा नये करूं, याविषयीं हिंदु कांत मतमेद आहे. उच्च जातींखेरीज इतर सर्वांस बहुधा असे करण्यास ८