पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकदर्पणाचा सारांश. ३२५ डापत्यकं चैव' या शाकलवचनाशीं विरोध येईल. वाचनिक सापिंड्याचा निषेध मानि- ला तर दशाहादि आशौचही प्राप्त होणार नाहीं: तसेंच असपिंडग्रहणस्थलींही निषेध व्यर्थच होईल ; ह्मणून ‘न सापिंडयं विधीयते' याचा अर्थ 'न' पदाची आवृत्ति करून सापिंड्य नाहीं असें नाहीं असें, किंवा काकूनें व्याख्यान करावें. 'दत्ताद्या ' इत्यादि कालिकापुराणवाक्यावरून स्वगोत्रसंस्कृतालाच पूर्ण पुत्रत्व सांगितलें तें सापिंड्य असतां- च संगत होतें. मनूचा अंशय असाच आहे. दत्तकत्व होमादिविधीनेंच साध्य आहे, असें मेधातिथि ह्मणतो, आणि विधवांचून दत्तक मानिला, तर जेथें दहा भावांत पां- चांत एकेकाला दहा दहा पुत्र असतील व पांचांस कांहीं नसेल तेथें प्रत्येकास पन्नास प नास पुत्र आहेत अशी आपत्ति येई 'तमेव तनयं चक्रे' इत्यादि कालिकापुराण वा क्यावरून वेतालयनेंही विधि केला हे सिद्ध होते. यावरून विधविांचून दत्तक होणार कसा यांचे उत्तर सांगतो. ' सर्वेषामेकजातानां ' या मनुवचनांत 'पुत्रवान्' या पदांत एक- वचनान्ताहून मतुष्प्रत्यय समजावा; ह्मणजे अनेक भावांत एकाला पुत्र असला तरी सर्व पुत्री होतात असा त्याचा अर्थ आहे. अशा स्थली विधीची जरूर मानिली तर 'नैकं ● ● , , पुत्रं ' इत्यादि निषेधाचा विषय होईल. ' तमेव तनयं चक्रे ' याचा 'मानिता झाला ' इत- काच अर्थ आहे. त्यानें विधि •न केला तरी त्याला श्राद्धाचा अधिकार आहे. बृहत्पराशर व बृहस्पति यांचा असाच अभिप्राय आहे. ' सर्वासामेकपत्नीनां या मनुवचनावरून सपत्नीपुत्र विधीवांचून जसा अधिकारी तसाच हा सम- जावा. तो अधिकार पौत्रादिकांस आहे तसा जाणावा. त्यानें तेरावा पुत्र हा होईल अशी शंका येत नाहीं. हें दत्तकौस्तुभांत स्पष्ट आहे. हे मानणे योग्य आहे. आपल्या पुत्रासारखें भ्रातृपुत्राकडूनही श्राद्धादि व वंशविच्छेदपरिहार यांचा होण्याचा संभव आहे. असें मानिलें असतां, मन्वादिवाक्यांत प्रतिग्रहादिक्रियाकल्पना नको; व याज्ञ- वल्क्यवाक्यांत भ्रातसुताचें पंचम स्थान अयुक्त होत नाही, कारण याचा परिहार विभक्तभ्रातृविषयांत पत्नी धनहारिणी, अविभक्तविषयांत भ्रातृपुत्रादिक, असा कमला- करभट्टांनीं निर्णय केला आहे. वस्तुतः सर्वदा पुत्र नसेल तर भातृपुत्रानेंच क्रिया करावी. पंचमस्थान दायमात्र घेण्याकरितां आहे. कुलद्वय उच्छिन्न झाल्यावर स्त्रियांस क्रि- येचा अधिकार आहे. भ्रतृपुत्राच्या पूर्वी ' न पुत्रस्य पिता कुर्यात् ' अशा निषेधानें पित्यास व भावासही अधिकार नाही. आतां होमादि हैं दांनांग किंवा प्रतिग्रहांग आहे हा विचार करितों. दानांग ह्मणतां येत नाहीं, कारण गोदानादिकांची होमावांचूनही सिद्धि होते. गवादिकांच्या घेणाऱ्यास होमादिविधि उक्त नाहीं. विवाहहोम अर्यमणंनु देव-इत्यादि मंत्रलिंगावरून कन्याप्रतिग्रहांग होईल ह्मणून आवश्यक आहे.