पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२६ हिन्दुधर्मशास्त्र. सापिंड्य सगोत्रोत्पत्ति यानें सिद्ध होते. अदृष्टार्थ होमविधि केला पाहिजे असेंही ह्मणतां येत नाहीं, कारण तसें मानिलें तर सर्व प्रतिग्रहांत घेणान्यास होमानुष्ठान प्राप्त होईल. कन्यादानाचा दृष्टांतही पूर्वपक्षाचा बरोबर नाहीं, कारण सॉपेंडसगोत्रांत कन्यादान निषिद्ध आहे, आणि दत्तविधि मुख्य आहे, असे वैषम्य येते. स्मृतिकारांनी सपिंड सगोत्रांत परस्पर मुख्य दानप्रतिग्रहाचा अंगिकार केला नाहीं. या अभिप्रायाने सरस्वतीविलास ग्रंथांत दौहित्र व भ्रातृपुत्र हे घेतले असतां होमादि केलेच पाहिजेत असा नियम नाहीं; वाग्दानमात्रं करूनच दानसिद्धि होते असें यमवाक्य आहे. या वाक्यांत भ्रातृपुत्रपदाने सर्व सगोत्रसपिंड समजावे. समानोदक सकुल्य सगोत्र घेतला तर बंधूनाहूय इत्यादि होमादि विधि केला पाहिजे. यावरून दत्तकदान मुख्य 1) नाहीं, गौण आहे, हें सिद्ध झालें तर निष्फलत्वात् दानांतच प्रवृत्ति होणार नाहीं असें ह्मणतां येत नाहीं, कारण दात्याला पारलौकिक फल- मोठें श्रुत नसले तरी ( घेणाराचें ) दायग्रहणरूप दृष्ट फल असल्याने दात्याची प्रवृत्ति संभवेल. जी पूर्वी पांच अपुत्रा- मध्यें प्रत्येकास पन्नास पन्नास पुत्र आहेत व प्रत्येक पुत्रास सहा सहा पिते आहेत अशी शंका केली, ती मनूचा आशय न जाणतां, कारण मनुवचनांत ' तेन' हें एक पुत्रबोधक पद आहे त्यानें उक्त दोष नाहीं. बहुत पुत्र असतील तेथील शंकेचा निरास मोक्त · वाग्दानाने करावा. ह्मणूनच सगोत्रसपिंड विवाहित असला तरी घ्यावा, असें गोविंदा- र्णवांत सांगितलें आहे. त्यावरून सगोत्र सपिंड पांच वर्षीचा मुख्य; त्यांत 'अपि ' शब्द, • नसेल तर विवाहितही ध्यावा. 'ऊर्ध्वं तु पंचमाद्वर्षात् ' हैं कालिकापुराणांतील निषे- धक वचन असगोत्राविषयीं आहे किंवा कुमारावस्थेत घेण्याचें फल अधिक आहे हें बोधन करण्याकरितां आहे हें ' अन्यथा दास उच्यते ' या वाक्यानं बोधित केले. आहे. ' अदासतोच्यते ' असा कौस्तुभामध्यें पाठ आहे. अदासता ह्मणजे दासाहून कांहीं विलक्षणता; ह्मणजे ऋक्थहारित्वमात्र स्वगोत्रत्व येणार नाहीं. पांच वर्षांनंतर मुलाची इच्छा असेल तर द्यावा. नाहीं तर देऊं नये. याविषयीं विक्रय व दान जे इच्छित नसतील त्यांचें करूं नये असे हेमाद्रीत व्यासदक्षादिकांचें वाक्य आहे, ह्मणून अशी व्यवस्था जाणावी की, अनेक सख्खे भावांमध्यें जेथें एकाला एकच पुत्र असले, तेव्हां बाकीचे अपुत्रांचा तो पुत्र विधीवांचूनही होतो. अनेक पुत्रवान् असले, एखादा नसेल, तर त्यानें सपिंड सगोत्र जवळचे किंवा ते नसले तर दुसरे जवळचे विधीकडूनच पुत्रीकृत करावे. जर सख्ख्या भावांमध्ये बहुतांस अनेक पुत्र असले, तर त्यांतील पुत्रवानांनी तुला मी हा दिला असें वाङ्मात्रानें किंवा होमादि विधीनें दिले तेच त्या अपुत्रांचे पुत्र होतात. येथें शंका: पूर्वोक्त यमवचनांत होमादिकांची अवश्यकता नाहीं असें सांगितलें. अन्यत्र होमादि विधान नित्य सांगितले, याची