पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ३१६ हिन्दुधर्मशास्त्र. घेतो. त्याला प्रमाण पूर्वोक्त बौधायनसूत्र आहे. विधानमालेमध्ये तर दत्तपुत्र झाल्यानंतर कदाचित् औरस होईल तर बापाच्या सर्व धनाचे दोघे समभागीदार होतील असे सांगितलेले आहे. जर विधान न करतां दत्तक घेईल तर त्याचे विवाहादि संस्कार करावे, परंतु तो धना- धिकारी होणार नाहीं. विधानाभावी दत्तक पितृद्रव्याचा मालक न होता एरवी जो वारस झाला असता तोच धन घेईल. दत्तक घेतल्यावर औरस झाले तर दत्तकाला ज्येष्ठत्व येणार नाहीं. ........ उपनयनादि संस्कार प्रतिग्रहीत्यानें केले असतां औरसाबरोबर हिस्सा मिळेल व उप- नयनान्त संस्कार पूर्वी झाले असल्यास विवाहासाठी धन मात्र मिळेल. औरस असतो. कांहीं संस्कार मात्र झाले असतील तर चतुर्थांश दत्तकाला मिळेल. " इति दायनिर्णय. कन्या दत्तक घेणें तेंही पूर्वी सांगितलेल्या विधीप्रमाणें करावें, कारण — वक्ष्यामि . पुत्रसंग्रहं ' इत्यादि वाक्यांत ' पुमान्पुत्र' या वचनांविषयीं वृत्तिकारांनीं लिहिल्याप्रमाणे पुत्र' पद अविवक्षित असून पुत्रीचेंही ग्रहण होतें. शिवाय पुराणादिकांत कुन्तीस दत्तकत्व सांगितलें आहे. पत्नीच्या अभावीं दत्तकदुहिताही दुहितृत्वामुळे धनाधिका- रिणी होईल. विद्वानांच्या संतोषार्थ अनन्तदेवाने दत्तकदीधिति रचिली आहे. त्यानें अनन्तदेव ( परमेश्वर ) संतुष्ट होवो.