पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तदीधितीचें भाषान्तर. 9 ३१५ पर्यंत सापिंड्य आहे. याची व्यव था सापिंड्य दीपिकेंत अशी केलेली आहे की, दत्तक्रीता- दिपुत्रांचे उपनयन जनकगोत्रांत झाले असेल तर, जनककुळांत सात पिढ्यांपर्यंत सापड्य असतें. घेणाऱ्या मातापित्यांचे कुळांत तर निर्वाप्यपिंडलक्षण तीन पुरुषपर्यंत सापिंड्य असतें. घेणाऱ्याच्या गोत्रांत सर्व संस्कार झाले तर साप्तपौरुष त्याचे कुलांत असतें. केवळ उपनयनच घेणाऱ्याच्या कुळांत झाले तर पांच पौरूष असतें असें पूर्वोक्तः पैठिनसिवचनाच्या साफल्याकरितां व्याख्यान करावें. हा सर्व सापिंड्याचा प्रकार सांगितला. हा केवल दत्तकाच्याच विवाहापुरता नाहीं, तर दत्तकाच्या संततीचाही दत्तकाच्या जनकपित्याच्या कुलांत उत्पन्न झालेल्या वंशजांशी संबंधाचा निर्णय करण्याकरि- तांही आहे. असें न मानिलें तर अर्जुन आणि सुभद्रा हीं दत्तक नसूनही यांच्या संबं- धाच्या असंभवाची शैका करून त्याच्या उपपत्तीविषयी आचार्यांनी गौतमवचनाचा उपन्यास केला तो असंगत होईल. ज्या दत्तकाला जसें सापिंड्य सांगितलें तदनुसारानेच - तें त्याच्या संततीसही जाणावें. ह्मणूनच जें मदनपारिजातांत सांगितलें आहे कीं, दत्तक- कन्येच्या पुत्राला आईचे घेणान्याच्या मातेच्या कुलांत त्रिपुरुष सापिंड्य आणि दत्तकपुत्रार्चे त्याच्या जनकपित्याच्या कुलांत त्रिपुरुष सापिण्ड्य आणि दत्तकपुत्राचें देणाऱ्याच्या व. घेणाऱ्याच्या दोन्ही कुलांत पांच पौरुष असतें, तें वर सांगितल्याप्रमाणें दत्तकाच्या संततीस लागू आहे असें ग्रंथकारांनी व्याख्यान केलें आहे. हा सापिंड्य निर्णय झाला. आतां आशौचनिर्णय सांगतों. दत्तक पुत्राच्या संबंधानें जनन किंवा मरण झालें असतां दोन्ही. पित्यांस त्रिरात्र आशौच सांगितलें आहे, आणि बाकी घेणाऱ्याच्या कुलांतील सपिंडांस एक अहोरात्र आहे. असपिंड पुत्रीकृत असला तरी याप्रमाणेच, कारण पुनर्भू स्त्रिया आणि केलेले पुत्र यांचें आशौच क्रमानें भर्त्यास व पित्यास त्रिरात्र असतें, व सपिंडांस एक अहोरात्र असतें, असे मात्रवग्रंथांत हारीतवन आहे. ह्मणून बीज संबंधावरून तीन दिवस आशौ- धरावें असें आहे. यास्तव तशा दत्तकानें पित्रादि मरण. झालें असतां त्रिरात्र धरावें, कारण ‘दत्तकश्च स्वयंदत्तःकृत्रिमः क्रीत एवच । सूतके मृतके चैवव्यहाशौचस्य भागिनः ।।' असें शुद्धि- विवेकांत ब्रह्मपुराणांतील वचन आहे. सपिंड जर पुत्रीकृत असेल तर सपिंडमरणादिप्रयुक्त सर्व सपिंडांस दश रात्र आशौच निर्विवाद आहे.. सापिंड्य जें आशौचाला कारण सां- गितलें त्याची व्यवस्था पूर्वी सांगितली तशीच जाणावी. हा आशौचनिर्णय झाला. आतां दायभाग सांगतों.. धनस्वामी मृत झाला असतां त्याची पत्नी, कन्या वगैरे विद्यमान असल्या तरी दत्तकपुत्रच त्याचें धन घेतो, कारण बारा प्रकारांतून कोणतेही प्रकारचा पुत्र नसेल तेव्हां " पत्नी दुहितरश्चैव या वचनानें पत्न्यादिकांस दायग्रहणाचा अधिकार सांगितला आहे... जर दत्तक झाल्यावर औरस पुत्र झाला तर तो दत्तकाचा चतुर्थांश: 19