पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.१.४. हिन्दुधर्म शास्त्र. असें भगवान् बौधायनमुनीनें सांगितलें आहे. 'एतच्चांगुलीयकं ' हें वरील सूत्र आहे त्यानंतरही पूर्वीच्या 'ददाति' पदाचा संबंध करावा, ह्मणजे कुंडल वगैरे यांचं दान घेतले - ल्या पुत्रानें करावें असें सिद्ध होतें. . ( सूत्रांत ) ' प्रभवतः ' हें पद आहे त्याचा माता व पिता यांसच दत्तकदानाचा अधिकार आहे, इतरांस नाहीं, हा आशय आहे. मध्ये ' याचा बंधूचे समक्ष असा अर्थ आहे. 'तुरीयभागे प्रभवति' यात्रा त्यास चतुर्थांश मिळतो असा अर्थ आहे. ( यापुढे ऋग्वेद्यांच्या उपयोगी शौनकोक्त पुत्रप- रिग्रहाचा प्रयोग विस्तृत दाखविला आहे तो व मयूखांतील प्रयोग प्रायः सारखा आहे ह्मणून त्याचें भाषांतर केलें नाहीं. कांही संकल्प वगैरे. भिन्न रीतीचे आहेत ते संस्कृता- वरून समजतील. ) यजुर्वेदी कर्ते असल्यास त्यांनी बौधायनोक्त रीतीनें प्रयोग करावा. पुत्राचे संस्कार झालेले नसले तर हा विधि झाल्यावर स्वस्तिवाचन नांदीश्राद्धादि करून जातकर्मादिसंस्कार करावे. आतां दत्तकाच्या विवाहादिकांच्या उपयोगी गोत्रा - दिकांचा निर्णय सांगतो. घेणाराने जातकर्मापासून किंवा चौलापासून संस्कार केलेला पुत्र असेल तर त्यास घेणाराचें गोत्रच लागू होते. ( देणाराचे सुटतें ). याच अभि- प्रायानें “ गोत्ररिक्थेजनयितुः " हें शास्त्र प्रवृत्त आहे. याहून भिन्न ह्मणून घेणारा • घेऊन मुंजमात्र केलेला अथवा मुंज झाल्यावर घेतलेला तो देवरातासारखा द्विगो- च होतो, ही व्यवस्था पूर्वी सांगितली आहे. तरी ही व्यवस्था अभिवादनांत ( व- डिलांस नमस्काराच्या विधींत ) व श्राद्धादिकांच्या ठाई गोत्राचा उच्चार करण्याकरितां आहे. विवाहामध्ये तर दोन्ही प्रकारच्या दत्तकांनी जनक व पालक या दोन्ही पित्यांचे गोत्र व प्रवर वर्ज करावे, कारण, प्रवरमंजर्यादिग्रंथांत दोघांच्या गोत्रप्रवरांचा निषेध केला आहे. हा दत्तकाच्या विषयीं गोत्रप्रवरनिर्णय झाला. आतां सापिण्ड्यनिर्णय सांगतों. त्याविषयीं गौतम ह्मणतो “उर्ध्वसप्तमात्पितृम्पोवीजिनश्वमातृबंधुभ्यः पंच- मादिति " हें वचन न्यायसुधाकारांनें दत्तकाविषयी आहे असें 'वासुदेवनं- गजाताच कौन्तेयस्य विरुध्यते, या वार्तिकाची व्याख्या करिते वेळेस कुंतीला जनक- पित्याच्या कुलांत सात पुरुषपर्यंत सापिंड्य आहे असे व्याख्यान केले आहे. सापिंड्य- मीमांसेंतही दत्तकाच्या विषयींच हें लागू केलें आहे ह्मणून दोन्ही कुलांत सात पुरुष- पर्यंत सापड्याचे विधान केलें आहे. पैठीनसि ह्मणतो कीं, मातृकुलांत तीन पिढ्या व पितृकुलांत पांच पिढ्या यांच्यापुढे विवाह करावा. याचें व्याख्यान अपरार्क ग्रंथांत असें आहे कीं, जे दत्तकादिपुत्र पितृकुलामध्यें सापिंड्य गोत्र व प्रवर यांपासून निवृत्त झाले असतील त्यांच्याविषयीं ' पंच पितृतः ' हें वाक्य आहे, त्यावरून घेणाऱ्या बापाच्या कुलांत सात पुरुषपर्यंत सापिंड्य आहे असें निश्चित होतें. प्राचीनांनी तर असें लिहिलें आहे कीं, घेणया माता व पिता या दोघांच्या कुलीत तीन पुरुष- 55 66