पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तकदीधितीचें भाषान्तर ३१३ पाक गृह्णाग्नीवर करून त्या देवतेस ) चरुहोम करावा, कारण ' यआहिताग्नेः पुरो- डाशास्तेऽनाहिताग्नेश्चरवः' असें शास्त्र आहे. याचा अर्थ 'जे अग्निहोत्र्यांस पुरोडाश विहित आहेत ते अग्निहोत्ररहित पुरुषानें चरु करावे. ' या सर्व निर्णयावरून संस्कार झालेलाही, व पांच वर्षांपेक्षां अधिक असला तरी, दत्तक होतो हें सिद्ध आहे. येथपर्यंत मुलगा घ्यावा कसा याचा विचार झाला. आतां शैौनकोक्त पुत्रग्रहणविधिवाक्याचे भाषांतर मयूखांत लिहिलें आहे ह्मणून येथे लिहिलें नाहीं. विशेष थोडा येथें आहे तो लिहितो. “ ये यज्ञेनेतिपंचभिः " या वाक्यानंतर 'दद्यात्' असे शेषपूरण करावें. पुढें होमांत 'यस्त्वादा' या दोन ऋचांनी दोन आहुति घालाव्या असें कोणी ह्मणतात तें बरोबर नाहीं. पुढे बौधायनसूत्रांत एकच आहुति सांगितली आहे त्याच्या एकवा - क्यतेने येथेही एकच आहुति घालावी असे सिद्ध करने योग्य होतें; कारण दोन्हींचें मूल श्रुतिवाक्य एक कल्पित करण्यांत. लाघव आहे. हा शौनकोक्त पुत्रप्रतिग्रहविधि ऋग्वेद्यांस मात्र लागू आहे, कारण शौनकवाक्यें त्यांच्याच गृह्यकर्मांचीं बोधन करणारी आहेत. आतां ' अथपुत्रप्रतिग्रहविधि० भगवान् बौधायनः ' या बौधायनसूत्रखंडाचें यथाश्रुत भाषांतर लिहितों. पुत्र घेण्याच्या विधीचें व्याख्यान देतों. पुरुषवीर्य आणि स्त्रीरक्त यांच्या मेलनापासून झालेला पुत्रं तो माता व पिता यांपासून जन्मला; त्याचे दान, विक्रय, व त्याग करण्याविषयीं माता व पिता हे अधिकारी आहेत. एकच पुत्र असेल तर ( देणारानें) देऊं नये व ( घेणारानें ) तसा घेऊं नये, कारण तो पूर्वज वडिलांच्या संततीच्या अविच्छेदाचा हेतु आहे. त्याची आज्ञा नसल्यास स्त्रीनें ( स्वातंत्र्यानें ) पुत्र देऊं वं घेऊं नये. पुत्र घेण्याच्या पूर्वी या विधीची सामग्री जमवावी ती अशी-धोतरजोडा, कानांतील कुंडलें, आंगठी, वेदपाठी आचार्य, कुशां- वे बार्ह, पलाशसमिधांचा इध्मा, बंन्धुजनांस बोलावून, ग्रामाध्यक्षास निवेदन करून, किंवा ब्राह्मणसर्भेत निवेदन करून, घरामध्यें ब्राह्मणास अन्नादिकाने तृप्त करून, पुण्याह- वाचन करून, स्थंडिलकरणापासून प्रणीतास्थापनापर्यंत अग्निमुख करून, दात्याजवळ जाऊन, पुत्र मला दे अशी याचना करावी. ( देणारानें ) देतों ह्मणून द्यावा. घेण्याचे मंत्र: " 'सुधर्मायत्वामहं गृह्णामि, संतत्यैत्वामहंगृह्णामि " हे दोन आहेत. यानंतर वस्त्रें, कुंडले, व आंगठीनं पुत्राला अलंकृत करून, परिधिस्थापनापासून अग्निमुखाचा उपक्रम करून, सिद्धचरूनें होम करावा. त्याचा मंत्र " यस्त्वाहृदा ० " त्वमश्यां ". या ऋचेचें पूर्वी उच्चारण करून " यस्मैत्वं० स्वस्तिस्वाहा " या ऋचेनें होम करावा. त्यानंतर ( आ- ज्यानें ) व्याहृतिहोम करून स्विष्टापासून अग्निपुख समाप्त करावें. धेनु, दक्षिणाव पूर्वीची वस्त्रें, कुंडलें, व आंगठी हीं आचार्यास द्यावीं. जर असे दत्तकग्रहण करून नंतर औरस पुत्र उत्पन्न होईल, तर तो ( औरसाच्या ) दायाच्या चतुर्थांशाचा भागी होईल ४.