पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ • हिंदुधर्मशास्त्र. " पर्यंत जनकपित्याच्या गात्रांत संस्कार झालेला मुलगा घेणाऱ्यांचा जरी पुत्र होतो, तरी त्याचाच होतो असें नाहीं, तर (देणाऱ्याचा व घेगाण्याचा ) असा द्वयामुष्यायण द्विगोत्र होतो. तसेंच चौलाहून पूर्वीचे संस्कार जनकपित्याच्या गोत्रांत केलेले असूनही चौला- पासून संस्कार घेणाऱ्यानें स्वगोत्रांत केले, तर तेव्हांच दत्तकादि पुत्र (पूर्णपणानें ) घेणा- ज्याच्या गोत्रांत येतील; नाही तर त्यांस " 'अदासता " ह्मणजे दासापेक्षां मात्र किंचित् अधिक योग्यता दाय घेणें वगेरे कारणांनी होते. पूर्णपणानें घेणाऱ्याचा तो पुत्र हें सिद्ध होत नाहीं. “ आयांतिपुत्रतांसम्यक् " या तृतीय चरणाचा तर पूर्णपणानें पुत्रत्वास प्राप्त होतात असा अर्थ आहे. त्यावरूनही चौलापासून संस्कार घेणान्याच्या गोत्रांत होणं है घेणाऱ्याच्या गोत्राच्या प्राप्तीचें कारण आहे असे वचनांचें तात्पर्य दिसतें. “ चूडादयः असें ह्मटले आहे ह्मणून चौंलाच्या पूर्वीचे संस्कार जनकपित्याच्या गोत्रांत केले असले तर, आणि चौलापासून संस्कार वेणाऱ्यानें स्वगोत्रांत केले तर द्व्यामुष्यायण तो होईल. तथा- पि दोन गोत्रांचा होणार नाहीं; तर घेणाऱ्याच्याच गोत्राचा होतो असें सिद्ध होते. जसे घेणान्याच्या गोत्रांत चौल करणे घेगाऱ्याच्या गोत्राच्या प्राप्तीचें कारण तसें त्याच्या गोत्रानें त्याच्या शाखेचा विधि मुंज करणें हें त्या घेणान्याच्याच शाखाध्ययनाच्या व कर्माच्या प्राप्तीचें कारण होते असे वसिष्ठाने सांगितलें तें असें: “ अन्यशाखोद्भवोदत्तः पुत्रश्चैवोपनायितः। स्वगोत्रेष्टिविधानेनसभवेत्तुस्वशाखभागिति ॥ ” अर्थ “ अन्यशाखेचा दत्तक घेऊन त्याचें कोणीं स्त्रशाखोधिनें उपनयन करून, स्वगोत्रानेंच जातेष्टि वगैरे कर्म केलें तर तो घेणाऱ्याच्याच शाखेचा होतो. ऊतु पंचमाद्वर्षात् " हें निषेधक वचन आहे ते स्वतंत्रपणानें भिन्न वाक्य होऊन निषेध करीत नाहीं. उत्तरार्धातील पुत्रेष्टि- विधीशीं वाक्यमददोष येईल तर जसे " अनाहुतिर्वैजर्तिलाश्चगवीधु काश्च या वा- क्याला " पयसाजुयात् " या पयोहोम विधीचें अंगत्व मानिलें आहे तसें या निषेधाला पुत्रेष्टिविधीचें अंगत्व आहे स्वातंत्र्य नाहीं असें जाणावें. पुत्रेष्टीचें विधान “ अग्नयेपुत्र- वते पुरोडाशमष्टाकपालं निर्वपेत् " इत्यादिक (तैत्तिरीयसंहितेंत द्वितीयकांडांत द्वितीया- ध्यायांत चतुर्थानुकांत प्रसिद्ध आहे ) . “ प्रथमंचरेत् " या वाक्याचा संस्कारांच्या पूर्वी करावी असा अर्थ आहे. कारण अन्वारंभगीया इष्टि केल्याने दर्शपूर्णमासाच्या आरंभाची योग्यता जशी सिद्ध होते, तशी पुत्रेष्टि केल्याने संस्कार करण्याची योग्यता सिद्ध होते ; असा अर्थ ज्ञात होतो. त्यावरून तशा संततीलांच पुत्रेष्टीची अपेक्षा आहे, द्वयामुण्यायणाला नाहीं हें सिद्ध होतें. याच रीतीनें पौनर्भवस्तोम या नांवाच्या सोम- यागाच्या द्वारानें पौनर्भवसंततीचा उपयोग जाणावा. ज्यांस अग्निहोत्र नसेल त्यांस पुत्रेष्टि करण्याचा असंभव आहे ह्मणून त्यांनी पुरोडाशाच्या स्थानी (स्थाली- 66 " " "" 66 66