पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तकदीधितीचें भाषान्तरं. 6 ३११ यास्तव लग्न झालेलाही दत्तक होऊं शकेल असें ह्मणतात. वस्तुतः असगोत्रांतही उप- नयनानंतर कोणताही पुत्र घेतां येत नाहीं, असें ह्मणतां येत नाहीं, कारण, वेदवाक्य- स्थलिंगाशीं विरुद्ध स्मृतिपुराणवाक्यांस प्रामाण्याचा असंभव बलाबलाधिकरणांत वार्तिकका- रानी (कुमारिलभट्ट) व राणकादिग्रंयांत सिद्ध केला आहे. वरील पुराणवाक्यांचा ब्राह्मणाशीं विरोध आहे, तो असाः ' दत्ताद्याः ' या पदानें कृत्रिमादिकांचेंहीं ग्रह- ण होतें हैं निर्विवाद आहे. · त्यावरून सत्राने संस्कार केलेला स्वयंदत्तही पुत्र होतो, असें निश्चित होतें. बह्वृत्र ब्राह्मणांत शुनःशेप हा विश्वामित्राचा पुत्र स्वयंदत्त झाला हें स्पष्ट सांगितलें आहे. तें असेंः “ अथशुनःशे रोविश्वामित्र त्यांकमाससाद सहोवाचाजीगर्तः- सोयंवसिष्ठऋषिःपुनर्मे पुत्रंदेहीति नेति होवाचविश्वामित्रादेवावा इमं मह्यमवासतेति सहदेवरातो- * विश्वामित्र आसेति.' यावरील भाष्य "शुनःशेप इत्यूव्व के स्पपुत्रास्त्वितिविचारेसति तदीयेच्छैव- नियामकेति महर्षीणां वचनं श्रुत्वाशुनःशेपः स्वेच्छयाविश्वामित्रपुत्रत्वमंगीकृत्य सहासादनीयमं- कमासादेति." अर्थ " शुनःशे हा यापुढे कोणाचा पुत्र व्हावा असा विचार होत अस- . तां त्या पुत्राचीच इच्छा याविषयीं प्रमाण असे मोठे मोठे ऋषींचें वाक्य ऐकून शुनःशेप 'विश्वामित्र पुत्र मी आहें' असा अंगिकार करून बरोबर बसण्यास योग्य स्थान ( पाहून विश्वामित्राच्या ) मांडीवर बसला " हा शुनःशेप मुंज न झालेला असें ह्मणतां येत नाहीं. कारण अनुपनीताला वेदाध्ययनाचा संभव नाहीं, आणि ज्याला वेदाध्ययन झालें नाहीं त्याला वैदिक मंत्र करून प्रजापतिप्रभृतिदेवतांची स्तुति करण्याच्या प्रवृत्तीचा संभव नाहीं. ती तर त्यानें केली हें तेथेंच ब्राह्मणांत स्पष्ट आहे तें असें." तस्माद्रः स्तूयमानः प्रीतोमन- साहिरण्यरथंददौ तमेतयाप्रतीयायशश्वदींद्रइति. " अर्थ " ( शुनःशेपानें ) स्तुति केलेला इंद्र मनापासून प्रसन्न होऊन त्या शुनःशेपाला सोन्याचा रथ देता झाला." तो 'शश्वदिद्र: ' हीं मंत्रऋक् ह्मणून पुराणवचनें समूल असली तरी अशा अर्थाने भाष्यांत व्याख्यान केलें आहे. ह्मणून पुराणवचनें समूल असली तरी त्यांची योजना अशी करावी कीं, 'अन्यबी- जसमुद्भवाः' यावरून दत्तकादिक पुत्र जातकर्मादिक संस्कारांनी घेणाराच्या गोत्रांत संस्कृ- त होतील तेव्हांच घेणाऱ्याचे पूर्ण पुत्र होतील; यांत पूर्णपणा हाच कीं, दत्तकास घेणारा- चेंच पुत्रत्व व गोत्र असावें ( देणाऱ्याचें नसावें ). त्यांत जरी जातकर्मादि संस्कारांत साक्षात् प्रधान कर्मात कोठें मोत्राचा उपयोग दिसत नाहीं तरी त्याचे अंगभूत नांदीश्रा- द्धांत गोत्रसंबंध दिसतो तो जाणावा. चूडाकर्मांत तर साक्षात्प्रधानकर्मांतच गोत्राचा संबंध आहे; कारण त्या त्या गोत्राच्या पुरुषांच्या प्रवरसंख्येच्या अनुसारानें शिखा करण्याचा विधि सांगितला आहे. तो असा: ' शिखाअपिहिकर्तव्याकुमारस्यार्ष संख्ययेति.' ह्मणूनच पूर्वोक्त कालिकापुराणांतील दुसऱ्या वचनांतही 'अन्यतः ' या शब्दांत षष्ठीच्या अर्थी तसिल् प्रत्यय आणि एवकाराच्या अर्थी चकार मानून योजना करावी. ती अशी ः चौल होई-