पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ई१० हिन्दुधर्मशास्त्र 66 कार सिद्ध होत नाहीं, अशी शंका सर्वथा करूं नये; कारण रक्षेत् कन्यां पिता विन्नां पतिः पुत्रास्तु वार्धके । अभावे ज्ञातयस्तेषां न स्वातंत्र्यं क्वचित् स्त्रियाः ॥ " या याज्ञवल्क्यवचनाचें व्याख्यान करिते वेळीं मिताक्षराकाराने निषिद्ध आचरणा- पासून कन्येचें रक्षण पित्यानें करावें असें सांगितले. यावरून स्त्रियांचे रक्षण निरनिरा- ळया अवस्थेत जें सांगितलें तें निषिद्धाचरणापुरतें समजावें, विहित कर्माच्या प्रतिबन्धा- विषयीं नव्हे. कोणत्याही देशांत शिष्टांनी नित्यकाम्यव्रताचरणाच्या कामी ज्ञाति- पारतंत्र्यामुळे प्रतिबन्ध होतो असें मानिलले आढळत नाहीं. असें नसतें तर उभय कुलांतील कोणी अवशिष्ट नसले तर, व्रतादिकांसाठी राजाची आज्ञा मागावी लागती. व्रतें व पुत्रप्रतिग्रह यांत कांहीं अंतर नाहीं. हें ध्यानांत न घेतां धर्मशास्त्रानभिज्ञांनी बहुत अज्ञान प्रकट केले आहे. प्रतिग्रहमन्त्रांचा अधिकार नाहीं ह्मणून स्त्रीला दत्तक घेतां येत नाहीं असेंही ह्म- णणें युक्त नाहीं, कारण अनुज्ञा असतां जसा विधवेला अधिकार येतो तसा अनुज्ञा नसतांही दत्तकप्रतिग्रहाचा अधिकार येतो. अनुज्ञा असतांही अमंत्रक विधि करावा हेंही ह्मणणें निरस्त झालें.. सारांश, विधवेने घेतलेला मुलगा वृत्ति व धन यांचा अ- धिकारी होतोच. त्याला प्रतिबन्ध करणारे आपल्याच अनर्थाचें साधन करितात; कारण ' जो ब्राह्मणाच्या वृत्तीत प्रतिबन्ध करील तो बहुत वर्षे कृमि होऊन राहील' असें वचन आहे. मुलाच्या चौलापासून "संस्कार पुढचे केले असोत किंवा नसोत, तसेंच मुलगा. पांच वर्षांहून लहान असो किंवा मोठा असो, तो दत्तक घ्यावा. पुढील कालिका- पुराणवाक्यावरून ज्याचे संस्कार झाले नाहींत व पांच वर्षे वयाची पूर्ण झाली नाहींत, तोच दत्तक घ्यावा असें भासतें (असें ह्मणतात); तीं वाक्यें अशी: "दत्ताद्या ये तु तनया निं- जगोत्रेण संस्कृताः । आयांति पुत्रतां सम्यगन्यवीजसमुद्भवाः ॥ पितुर्गोत्रेण यः पुत्रः संस्कृतः पृथिवीपते । अचूडांतं न पुत्रः स पुत्रतां याति चान्यतः ॥ चूडाद्यां यदि संस्कारा निजगोत्रेण वै कृताः । दत्ताद्यास्तनयास्तेस्युरन्यथाऽदासतोच्यते ॥ उर्ध्वं तु पंचमाद्वर्षान्नदत्ताद्याः सुता नृप । गृहीत्वा पंचवर्षीय पुत्रोष्टं प्रथमं चरेत् ॥ पौनर्भवं तु तनयं जातमात्रं समानयेत् ॥ कृत्वा पौनर्भव- स्तोमं जातमात्रस्य तस्य वै ॥ सर्वांस्तु कुर्यात्संस्कारान् जातकर्मादिकान्नरः । कृते पौनर्भवस्तो- मे सुतः पौनर्भवः स्मृतः ॥” परंतु तें ह्मणणे बरोबर नाहीं; कारण बहुत कालिकापुराणाच्या पुस्तकांत या वचनांचा पाठ दिसत नाहीं ह्मणून हीं निर्मूल आहेत असें कोणी ह्मणतात. (नीलकंठ दिक) दुसरे पंडित, हीं वचनें समूल असली तरी पहिले तीन श्लोक असगोत्रा- विषयीं आहेत हें स्पष्टच आहे. त्यांच्या साहचर्याने पुढील श्लोकही असगोत्राविषयींच लागतो ही कल्पना करणें योग्य आहे, ह्मणून सगोत्र दत्तकाला हा नियमे लागत नाहीं..