पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तदीधितीचें भाषांतर. ३०९ असे नाहीं; कारण त्या प्रवृत्तीमध्यें नियमाला कारणीभूत पाक्षिकप्राप्तीचा संभव नाहीं. तसेंच आज्ञा घेणें शक्य आहे ह्मणून कांहीं विशेषणावांचून नियमविधि मानण्यास लाबत्र येत नांहीं; ह्मणूनच “ उपांशुयजुषा " या वाक्याला विशेष स्थलीच उपयोग मानि ला आहे. (पूर्वमीमांतेच्या द्वितीय अध्यायामध्ये ) अ असतां जलें ' पक्षान्तं कर्म निर्वर्त्य वैश्वदेवं च साग्निकः । पितृयज्ञं ततः कुर्यात् ततोन्वाहार्थकं बुधः ॥ " या वाक्याने `वैश्वदेवाधिकारी साग्निक त्याच्याच संबंधानें पितृयज्ञाचा अंगभूत वैश्वदेवाचा उत्तर- काल जरी नियमित आहे, तरी ज्येष्ठ पुत्राशीं कनिष्ठ भाऊ विभक्त न झाल्याकारणानें ते वैश्वदेवाचे अधिकारी नसले तरी साग्निकाला पिंडपितृयज्ञाचा अधिकार नाहींसा होत नाहीं. तसें सभर्तृक स्त्रीच्या संबंधाने वरील नियम करणाऱ्या वचनांनी विधवेला पुत्र घेण्याचा अधिकार नाहींसा केला नाहीं. यावर शंका अशी आहे की, भर्याची आज्ञा- रूप जें अंग तें सोडून द्यावें ह्मणजे ज्या अनुज्ञेनें “ नापुत्रस्य लोकोस्ति” या वचनानें . अवश्य कर्तव्य पुत्रग्रहणांतही सायंकालानंतर प्रातर्होम जसा होत नाहीं तसा विधवेला दत्तक घेण्याचा अधिकार नाहींसा होईल अशी शंका करूं नये ( कारण येथें आज्ञारूप अंग सोडण्यास प्रमाण नाहीं ). याचा सर्व लोकांनी विचार करावा. यानंतर अंगत्वाची प्रतिज्ञा टाकूनही जिला भर्त्याची आज्ञा झाली नाहीं तिला पुत्र घेण्याचा निषेध या वाक्याने केला जातो असें जरी टलें तरी विधवेला दत्तक घेण्या- चा अधिकार नाहींसा होऊं शकत नाहीं, कारण ( वचनांतील ) अनुज्ञा शब्दाचा अर्थ अधीष्टादिशब्दाच्या अर्थासारखा पुरुषांचा अभिप्राय ( तात्पर्य ) असा आहे, असें असतां भत्यीचे जीवनदशेमध्ये किंवा मरणानंतरही त्याचा पुत्र घेण्याचा अभि- प्राय होता असें जाणणाऱ्या स्त्रीला पुत्र घेण्याचा अधिकार कसा नाहींसा होईल ? तू पुत्र घ्यावा असें व्यक्त बोलून भर्त्ता मरेल व तदनंतर विधवेने दत्तक घेतला तर तो भर्त्याचे आज्ञेनेंच घेतला आहे. हैं: स्पष्टच होते; जसें ( यज्ञकर्मांत ) यजमान ( ऋत्विजांस ) ब्राह्मणाः संस्थापयत मे यज्ञं " असें बोलून आहवनीयकुंडाजवळ गेल्यानंतर ऋत्विजांनी सर्व यज्ञकर्म समाप्त केलें तरी यजमानाच्या अनुज्ञेनेंच केलें असें होतें. 66 66 • खरें विचारिलें तर नापुत्रस्य लोकोस्ति " इत्यादिशास्त्राने पुत्र न घेतल्यास दोष सांगितला आहे त्यामुळे जिला स्पष्ट भर्त्याची आज्ञा झाली नसेल तिलाही पुत्र घेण्याचा अधिकार सांगणारें हैं शास्त्र आहे, निषेध करणारें नाहीं, कारण शास्त्रानें अवश्य प्राप्त जी गोष्ट आहे तिचा निषेध करणे अयोग्य आहे आणि पर्युदास मानण्यांत लक्षणा- दोषही येईल याचा विद्वान् लोकांनी विचार करावा. आतां " न स्वातंत्र्यं क्वचित् स्त्रियाः " " अभावे ज्ञातयः " या वचनांनी विधवे- ला ज्ञातिपारतंत्र्य आहे. ह्मणून ती निपुत्रिक असल्यास पुत्र घेण्याविषयीं अधि-