पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ हिन्दुधर्मशास्त्र. अनुवाद न झाला असतां त्याच्या अर्थाला अपूर्वविधेयत्व नसल्या कारणाने पुल्लिंगाची विवक्षा सर्वथा होणार नाहीं. शिवाय पूर्वपक्षांमध्ये 'एवकारश्रवणादेव पंस्त्वस्याविवक्षितत्वा- तू हे दोन सांगितलेले हेतु विरुद्ध आहेत, कारण अश्वमेधयागामध्ये अतिदेशाने प्राप्त वि- धिवाक्यामध्ये अप्राप्त जरी षडिशतिपद असले, तरी " पडिशतिरित्येवब्रूयात् ” या वा- क्यांतील षड्शितिपदार्थाला एवकाराच्या अर्थाची विशेषणता आहे ह्मणून विधेयत्व नाहीं असें पूर्वमीमांसेंत सांगितलें आहे. तसेच सोमप्रकरणांत “ आज्यमेवावपति " या वा- क्यांत मधल्या तीन ऋचांमध्यें अप्राप्त जरी आज्यस्तोत्राचा निवेश असला तरी त्या वा- क्यापासूनच त्याचें विधान मानिलें नाहीं, तसें उत्तरमीमांसेतही " आत्मानमेवा लोकमुपा- सीत " इत्यादि वाक्यांत या पदापासूनच आत्मोपासनेचें विधान विवरणादिग्रथांत मानले नाहीं. असें असतां एवकाराच्या अर्थाचें जें विशेषण त्याला प्राप्तीचा संभव असल्या कार - णानें विधेयत्व न आल्यामुळे त्याचे विशेषण में पुल्लिंग. त्याची विवक्षा कशी होईल याचा मोठ्या विद्वान् लोकांनीच विचार करावा. जर ‘“ तैरेवरश्मिभिरूर्ध्वमाक्रमते” या वाक्यासारखे कोणत्याही प्रकारानें असंबंधाचे व्यावृत्ती करतांच केवल एवकारालाही अनुवादत्व मानून पुल्लिंगाची विवक्षा केली तरी “ मलिनः स्नायात्” या वाक्यांतील मलिनपदासारखें फलकामनेची अपेक्षा असल्याकारणानें अपुत्रपद अधिकाऱ्यांचें बोधक आहे असें मानिलें पाहिजे. त्यावरून " स्वर्गकामो यजेत " या वाक्यांतील स्वर्गकामपदांत पुल्लिंगाच्या अविवक्षेचा साधक जो पुर्वममितेच्या साहावे अध्यायांतील न्याय त्यानेंच पुल्लिंगाची अविवक्षा सिद्ध होते ह्मणून पहिले दोन्ही हेतु खो- टे झाले हैं उघडच आहे. आतां अशी शंका येते कीं, अपुत्रपदांतील पुल्लिंग विवक्षित आहे असें मानून ( अ- पुत्रेण हें वाक्य) दुसऱ्या शास्त्रांनीं प्राप्त जो पुत्रपरिग्रह त्याचें अनुवादक असल्यामुळे. पुरुषांनींच दत्तक घ्यावा, स्त्रीनें घेऊं नये, अशी परिसंख्या कां मानूं नये ? या शंकेचें समाधान हैं कीं, असें मानिलें असतां स्त्रियांनी जे पुत्र घेणें त्यांना 'भर्त्या - ची अनुज्ञा अंगभूत मानिली आहे तीही खोटी होईल. शिवाय 'न स्त्री पुत्रं दद्यात् ' इत्या- दिक जो तिसरा हेतु सांगितला आहे तोही बरोबर नाहीं, कारण या निषेधवाक्याचा वि- चार केल्याने भर्त्याच्या आशेला पुत्रग्रहणाचे अंगत्व मानणारांनी अंगत्वामुळे तिला विधे- यत्व आहे असें मानिलें पाहिजे ; कारण में विधान केलें नाहीं तेथें तें अंग होत नाहीं असा न्याय आहे; ह्मणून पुत्र घेण्याच्या वेळेस भर्त्याची आज्ञा घ्यावी असा विधि ज्या अधिकायला प्रवृत्त केल्याने नियमविधिरूप होतो आणि जो विधानाच्या विषयांत सांगि- तला असेल त्याचेंच ज्ञान होईल ह्मणून सभर्तृक स्त्रच्यिाच संबंधाने वरील निषेवाची प्रवृत्ति