पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• ३०६ हिन्दुधर्मशास्त्र. चनाच्या उत्तरार्धात सपिंड न मिळेल तेव्हांच असपिंड ध्यावा असा नियम केला आहे, व गोत्रापेक्षां सापिंड्य संबंध जवळ असल्या कारणानें सापिंड्याच्या सादृश्याला अधिक बल येते. कोणत्याही प्रकारानें सपिंड न मिळेल तर सगोत्राचें ग्रहण करावें असें वरील वृद्धगौतमवाक्यानेंच सिद्ध होते; कारण 'न सापिंड्यं विधीयते ' या चतुर्थचरणां- तील निषेधाचा असपिंड सगोत्राच्या ठायींच संभव आहे. • सगोत्रही न मिळेल तर असगोत्र हो ( ध्यावा ). ( यास प्रमाण) “ दत्ताद्या अपि तन- या निजगोत्रेण संस्कृताः । आयांति पुत्रतां सम्यगन्यवीजसमुद्भवाः " असें कालिकापुराण- वाक्य आहे. (अर्थ) दत्तकादिपुत्र जे तेही आपल्या गोत्राने ( घेणाराच्या गोत्रानें ) सं- स्कार केलेले असले तर ते अन्याचे बीजापासून उत्पन्न झाले असले तरी ते ( घेणाराचे ) पुत्र होतात. (दुसरें प्रमाण) “ गोत्ररिक्थे जनयितुर्नहरेद्दत्रिमः सुतः" हें मनुवचन आहे. ( अर्थ ) दत्तक पुत्र आपल्या जनकपित्याचें गोत्र व दाय यांचा भोगी होत नाहीं आणि •" दत्तक्रीतादिपुत्राणां बीजवस्तुः सपिंडता । पंचमी सप्तमी तद्वत् गोत्रं तत्पालकस्य च ।। " असें बृहन्मनुवाक्य आहे. (अर्थ) दत्तक, क्रीत वगैरे जे पुत्र यांचे सापिंड्य (जनकमा- तेच्या संबंधाने) पांच पिढ्यांपर्यंत, व जनकपित्याच्या संबंधानें सात पिढ्यांपर्यंत आहे; तसें गोत्रपालकपित्याचेंच आहे. असें या वचनांत सपिंड व सगोत्र यांच्या व्यवस्थेचें विधान केलें आहे. असगोत्रामध्येही बहिणीचा मुलगा व दौहित्र यांचा निषेध शौनक सांगतो “ दौ- हित्रो भागिनेयश्च शूद्रैस्तु क्रियते सुतः । ब्राह्मणादित्रये नास्ति भागिनेयः सुतः क्वचित् ॥ ' ( अर्थ ) दौहित्र व बहिणीचा मुलगा हे शूद्रांनी ध्यावे; ब्राह्मणादि तीन वर्णीत' बहिणीचा मुलगा कोठेही दत्तक नाहीं. ( या वचनाचे उत्तरार्धांत जरी दौहित्र पद नाहीं तरी ) पूर्वार्धामध्यें भागिनेय पद दौहित्राचे बरोबर सांगितलें आहे ह्मणून उत्तरार्धांत भागिनेय पदानें दौहित्रही घ्यावा आणि त्यावरून पुत्रत्वबुद्धि होण्याला अयोग्य जे भाऊ, काका वगैरे. त्यांचाही निषेध समजावा. आपआपल्या वर्णाचाच घ्यावा हा नियम तर पूर्वी सांगितलेल्या शौनकवा - 'क्यांत “ अन्यत्र तु न कारयेत् " या चरणाचा ब्राह्मणांनी आपल्या वर्णाशिवाय दुसरे वर्णा- चा दत्तक घेऊं नये असा अर्थ आहे त्यानें सिद्ध होतो. तसेंच “ क्षत्रिया- णां स्वजातौ वा गुरुगोत्रसमोपि वा । वैश्यानां वैश्यजातेषु शूद्राणां शूद्रजातिषु ॥ सर्वेषां चैव वर्णानां जातिष्वेव न चान्यतः ॥" अशीं शौनकवाक्यें आहेत. क्षत्रियांनी आपले वर्णाचा द- त्तक घ्यावा व तो पुरोहिताच्या गोत्राशी बरोबर असेल तो घ्यावा; वैश्यांनी आपले .जा- तीता, शूद्रांनी आपले जातींतलाच घ्यावा. सर्व वर्णांनी आपआपले जातींतलाच घ्यावा, अन्याचे जातींतील घेऊं नये. वरील विशेषवचनांनीच आपआपल्या वर्णाचा