पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तकदीधितीचें भाषान्तर. स्वाचा अनुवाद आहे. वरील अर्थ सांगितला आहे त्यावरून केवळ परलोकमात्राची इच्छा करणाराला स्वतः पुत्र नसून भावाचा पुत्र मात्र आहे तर त्याला दत्तकादिकां- च्या स्वीकाराविषयी प्रवृत्तीचें कारण नाहीं. पत्न्यादिकांच्या पूर्वी आपल्या पिंडदा- नाचा व दांयाचा अधिकारी कोणी व्हावा अशी इच्छा असल्यास भावाच्या मुलासच दत्तकविधीने घ्यावा अशी सिद्धिही अर्थात् होते हें वाक्याचें प्रयोजन आहे; कारण निपुत्रिकपणाच्या दोषाची निवृत्ति व्हावी या हेतूनें पुत्रासारख्याचेंच प्रतिनिधिरूपानें स्वीकरण योग्य आहे हें तर ( मीमांसेच्या ) सहाव्या अध्यायांतील प्रतिनिधिन्यायें- करूनच सिद्ध होईल. अशी योजना केली असतां मन्वादिवाक्यांमध्ये अश्रुतप्रतिग्रहा - दिकल्पना करण्याचा क्लेश नाहीं; व मिताक्षरादि ग्रंथांशीही विरोध नाहीं, आणि याज्ञवल्क्य दिवाक्यांत ( दायग्रहणाविषयीं ) भावांचे मुलांची पंचमस्थानीं योजना आहे तीही सयुक्तिक आहे; कारण पुत्रीकरण केल्यावांचून भावाचे मुलगे, पत्न्यादिक असल्या तरी, त्यांचा अनादर करून पुत्राचे कार्य में पितरांचे ऋण दूर करणें, याचे अधिकारी जरी वचनेंकरून होतात; तरी दाय घेण्याच्या अधिकाराचा संभव त्यांस नाही. पुत्रीकरण केलेले जे भ्रातृपुत्र आहेत त्यांस तरं दायग्रहणाचा अधिकार संभवतो असे मानले असतां कालिकापुराणांतील वचन संगत होतें. त्याचा अर्थ अताः - शंकराचे पुत्र दोघे, वेताल आणि भैरव, हे नंदीच्या वाक्यावरून पुत्र संपादन करण्यास प्रवृत्त झाले. त्यांमध्ये भैरवाने उर्वशी अप्सरेच्या ठायीं उत्पन्न केलेला जो पुत्र तोच त्याच्या भावाने, वेतालानेही, आपला पुत्र मानिला. (तें वचन असे ) " ततः कदाचिदुर्वश्यां भैरवो मैथुनं गतः । तस्यां संजनयामास सुवेशं नाम पुत्रकं । तमेव चके तऩयं वेतालोपि स्वकं सुतं ॥ " या मतामध्ये ( या वचनाचा ) अर्थ जर आपल्या पुत्राच कार्य करणारा हा आहे इतकं समजून ( पुत्रीकरणावांचूनही ) तोच पुत्र मानतो असा, किंवा ( वेताल ) प्रतिग्रह करून आपला पुत्र करिता झाला असा याप्रमाणें दोन्ही प्रकारचे जरी अर्थ केले तरी कांहीं बाध नाही. "" भावाचा मुलगा न मिळेल तर पूर्वी सांगितलेल्या शौनकवाक्यावरूनच ग्राम सपिंड मिळण्याचा असंभव असल्यास केवल सगोत्रच घ्यावा असें वृद्धगौतम सांगतो: 'सगोत्रेषु कृता ये स्वादयः सुताः । विधिना गोत्रतां यांति न सापिंड्यं विधीयते ॥ " अर्थ:-- दत्तक, क्रीत कौरे पुत्र हे सगोत्रांत विधीनें केलेले असतील तर त्यांस संततिरूपता प्राप्त होते; सापिंड्य प्राप्त होत नाहीं. " गोत्रता हाणजे संततिरूपता. यास. प्रमाण " संततिर्गोत्रजननकुलान्यभिजनान्वयौ " असा. अमरकोशांत द्वितीय कांडांत सातव्या वर्गाचा (ब्रह्मवर्गाचा ) पहिला श्लोक आहे. सपिण्ड सगोत्राचा असंभव असल्यास असगोत्र सपिंडच घ्यावा, कारण शैौनकव- ३. ९