पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०४ हिन्दुधर्मशास्त्र. पाठ आहे ह्मणून भावाचा मुलगा विधि नसतांही पुत्र होतो हें समजणें युक्त आहे; आणि मनुस्मृतींतही सपत्नीपुत्राला विधीवांचूनही पुत्रत्वाचें विधान करणारे ' भ्रातृणामेकजातानां' या वचनाच्या बरोबर पटण केलेले दुसरे वचन आहे. “ अनेक सपत्नीमध्ये एक जर पुत्रवती असेल तर त्या पुत्राकडून त्या सर्व स्त्रिया पुत्र- वती आहेत असे मनूनें सांगितले आहे." तेही. बरोबर नाहीं; कारण प्रतिग्रहविधी- वांचून भावाच्या मुलास जर पुत्रत्व येईल तर तो तेराव्या प्रकारचा पुत्र प्राप्त होईल. पुत्र तर बारा सांगितले आहेत. त्याविषयों प्रमाण: "स्वायंभु मनु बारा प्रकारचे पुत्र सांगतो " याच्याशीं विरोध येईल आणि 'पत्नी दुहितरश्चैव' या याज्ञवल्क्यवचनामध्ये ( दायग्रहणाविषयीं) पुतण्यांचे भाऊ झाल्यानंतर स्थान सांगितले आहे तें अनुपपन्न होईल, व भावाच्या मुलांस इतर पुत्रासारखें पत्नीच्या पूर्वीच धन घेणें उचित होईल. " भ्रातॄणामेकजातानां "" या वचनाने विज्ञानेश्वरानें व्याख्यान केलें तें असें:- भावांच्या मुलाचें पुत्रीकरण संभवेल तोपर्यंत इतर पुत्र घेऊं नये है वचनाचे तात्पर्य आहे. विधीवांचून तो पुत्र होतो असे त्याचें तात्पर्य नाही; कारण तत्सुतो गोत्रज: " या याज्ञवल्क्यवचनाशीं विरोध येईल. 66 "" यावर शंकाः हें पुत्रत्वप्रतिपादक वचन व्यर्थ होईल. याचे समाधान असे की, नापुत्रस्य लोकोस्ति : “ जायमानो वै ब्राह्मणस्त्रिभिरृणवाजायते ब्रह्मचर्येण ऋ- षिभ्यो यज्ञेन देवेभ्यः प्रजया पितृभ्यः " अशी दोन श्रुतिवाक्यें आहेत. त्यांचा क्रमानें अर्थ असा की, पुत्ररहिताला परलोकप्राप्ति नाहीं, व ब्राह्मण जन्मतः तीन ऋगांनों ऋणी होतोः ब्रह्मचर्यतें करून ऋषींचें ऋण परिहार करितो, यज्ञ केल्यानें देवांचें, आणि प्रजा उत्पन्न केल्यानें पितरांचें. असे शास्त्र आहे त्यावरून आणि लोकाचारा: वरूनही ( भावाच्या मुलास ) पुत्रत्व तर निर्विवादच आहे, कारण वरील वाक्यांनीं बोधित निपुत्रिकपणाचा जो दोष त्याची निवृत्ति भावाच्या मुनेंही होते, बाकीचं पुत्रं- कार्य बारा प्रकारचे पुत्रांहून निराळ्या भावाच्या मुलानेंही निपुत्रिक पितृव्या- चें करितां येतें. असें सांगण्यानें वरील वचन संगत होतें. " एकस्थापि सुते जाते यद्येकः पुत्रवान् भवेत् " याचा क्रमानें अर्थ असा की, एकालाही पुत्र झाले असतां, जर एक पुत्रवान् असेल इत्यादि वचनांनी उत्पत्तिमात्रानें किंवा सत्तामात्राने इतरांस पुत्रत्वाचें कथन केले आहे. हें ह्मणणें योग्य आहे; कारण निपुत्रिकाला आपल्या पुत्रप्रमाणेंच भावाच्या मुलांकडून सर्व पितरांच्या पिंडदान, तर्पण, व श्राद्धक्रिया घडतात ; आणि वंशविच्छेदपरिहाराचाही संभव आहे. ह्मणून 'भ्रातॄणां, ' 'सर्वे पु- त्रिणः ' या वचनांतील बहुवचन 'तावतो वरुणान्' या वाक्याप्रमाणे दृष्टानुरोधानें आणि 'यजेरन्' या पदासारखें यथासंभवानें प्राप्त बहुत्वाचा अनुवाद आहे. वरील अर्थ