पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तकदीधितीचें भांषान्तर: ३०३ पुत्रवान् या पदांत पुत्रः पुत्रौ पुत्रा वा विद्यते यस्य असा अर्थ प्रतीत होत नाहीं, ह्मणून शास्त्रविरुद्ध तात्पर्य वर्णन करण्याचा संभव आहे. पुत्रवान् या पदामध्यें मतुप् प्रत्यय आहे त्यामुळे एकहायनीपदांत भट्टपादांनी जो न्याय सांगितला आहे त्याप्रमाणें संरूपाविशेषाची प्रतीति न होतां पुत्रयुक्त इतक्याच अर्थाची प्रतीत होते. यावर शंकाः येथे दर धातु गौणार्थ आहे. ह्मणून वर सांगितलेले स्थलांत ( दत्तक- दानादिकाविषयीं ) प्रवृत्ति होणार नाहीं ? ( तरी याचे समाधान असें कीं ), या स्थली दा धातु गौणार्थक नाहीं हें पुढे लौकरच सांगावयाचे आहे. ( या वचनांत ) पुत्रपद औरस पत्रालाच लागू होते; कारण जन्यपुंस्त्वाचा वाचक पुत्र शब्दाची औरसांतच मुख्य प्रवृत्ति आहे त्यामुळे भावाचा मुलगाही दत्तक वगैरे असून त्याला दुसरा भाऊ झालेला असला तरीही त्याचें ग्रहण करूं नये. उत्तरार्धांत 'तेन ' हैं एकवचन आहे त्यावरून आणि पुत्रिगः हें बहुवचन आहे त्यावरून अनेक भाऊही एक काली एक पुत्रास जसे अनेक पांडवांनी एक काली भायारूपाने द्रौपदीचें ग्रहण केलें तसें घेऊं शकतील; आणि द्वयामुष्यायण जसा दोघांचा पुत्र होतो तसें अनेकांचें त्याला पुत्रत्व प्राप्त होऊन त्याचें फलही अनेकांस प्राप्त होतें. सत्रांत जसें सर्वांनीं यजमान होऊन संकल्प करावा लागतो तर्फे सर्व भावांनी मिळून पुत्रप्रति- ग्रहाचा संकल्प केला पाहिजे अशी शंका करूं नये, कारण ज्या स्थली अनेक भावांपैकीं भावाचा मुलगा कांहीं भाऊ घेण्याची इच्छा करितात व कांहीं करीत नाहींत, तेथें इच्छा करणारास भावाचा मुलगा घेण्याचा असंभव होईल. कोणी असें ह्मणतात ' भ्रातृणामेकजातानां' या मनुवचनांत ( भावांनीं ) प्रतिग्रह- विधि केला पाहिजे असें अनुमानच होत नाहीं; तर विधवांचूनही भावाचा मुलगा निपुत्रि "क पितृव्याचा पुत्र होतो असें विधान केलें जातें. त्यानें पुत्रासारखाच ( पुतण्यासही ) श्रा- द्धाचे अधिकाराचा लाभ होतो. त्याविषयीं बृहत्पराशर सांगतो: “ निपुत्रिक पितृव्या- च्या भावाचा पुत्र असेल तर तो त्याचाच पुत्र होतो ; आणि तोच त्याचें श्राद्ध, पिंडदान, तर्पण वगैरे करील. " ( तसेंच ) बृहस्पति सांगतो. 'एकापासून उत्पन्न झालेल्या अनेक सख्या भावांमध्ये एकालाही पुत्र झाला असतां सर्व ते पुत्रवान् होतात " असें सांगितलें आहे ; व अनेक सपत्नविषयों हाच विधि सांगितला आहे ( ह्यणजे ) अनेक सपत्नीमध्ये एक स्त्री जरी पुत्रवती असेल तर तिचा तो पुत्र आपल्या सर्व सापत्नमातांच्या श्राद्धादिकांचा अधिकारी होतो. येथें सपत्नीपुत्राला विधीनें घेतल्यावांचूनही श्राद्धाधिकार सांगितला आहे ह्मणून, आणि बापाच्या स्त्रिया सर्व मातृसमान आहेत " इत्यादि शास्त्रावरून व लोकव्यवहारा- वरून पुत्रत्व निर्विवाद आहे. या वचनाच्याच पूर्वी ' यद्येकजातावहवः ' या वचनाचा