पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयी. on घटस्फोट व पुनर्विवाह ह्यांविषयी - “पहिला नवरा मेल्यानंतर, त्याची विधवा स्त्री दुसऱ्याबरोबर पाट लावून विवाह करूं शकते. एका पुरुषास एकच लग्नाची बायको करितां येते; परंतु पाटाच्या दुसऱ्या पुष्कळ बायका करतां येतात. " (पृ० २०१ ) आणखी :-- 66 ब्राह्मण, वैश्य, सोनार, व दुसऱ्या एक दोन जाती, यांशिवाय बाकी सर्व जातींत पुनर्विवाह करण्याची परवानगी आहे. परंतु देशमुखादिकांच्या प्रतिष्ठित घराण्यांत ह्याविषयी प्रतिबंध आहे. पहिल्या व दुसऱ्या लग्नांत फरक इतकाच आहे की, जर पहिल्या विवाहानें केलेली स्त्री कांही अपराध करील तर घटस्फोट अथवा फारखत- नामा करण्याचा अधिकार नवण्याकडे राहातो; परंतु नवरा अपराध करील तर बाय- ऋोला दाद मागण्याचा अधिकार राहातो. दुसऱ्या विवाहानंतर दोघांपैकी कोणीही घटस्फोट करूं शकतो " ( पृ० २११. ) मानभाऊ लोकांच्या चमत्कारिक चाली:- “ अविवाहित राहावें अशी जरी या लोकांची शपथ असते तरी त्यांमध्ये पुष्कळ व्यभिचार होतो असा त्यांवर आरोप आहे. • अविवाहित रहावे अशी शपथ असून ही यांस विवाह करण्याही परवानगी आहे. यांच्या विवाहविधीचे दोन प्रकार आ- हेत. . ( १ ) वधू व वर आपल्या महन्तापुढे लोळतात; व असे करतांना जेव्हां एक- मेकांचा स्पर्श एकमेकांस होतो, तेव्हां विधि आटपतो. ( २ ) दुसरा प्रकार:- रः -- दोघे जणे आपल्या भिक्षा मागावयाच्या झोळ्या घेऊन महन्तापुढे जातात व तो त्यांच्या एकमेकांच्या झोळ्यांस गांठ मारितो. ती गांठ मारली ह्मणजे विधि आटोपतो" (पृ.२१४). 66 इलिचपूर प्रांतांतील एका विवाहाचा वृत्तान्त पुढें दिला आहे. त्याची हिंदु- स्थानांतील इतर विवाहांच्या रीतींशी तुलना करावीः वर, व त्याच्या कुटुंबांतील इतर माणसें वधूच्या गांवीं जातात व वधुवराच्या अंगास हळद लावतात. नंतर त्यां- स स्नान घालतात. हें आटपल्यानंतर त्यांच्याकडून कुलस्वामीची व गणपतीची पूजा करवितात. संध्याकाळी त्या दोघांमध्ये ब्राह्मण अन्तःपट धरतात, व मुहूर्ताच्या वेळीं जमलेल्या लोकांच्या अंगावर ज्वारीच्या अक्षता टाकितात; व त्यांच्यामध्यें धरलेला अन्तःपट दोघांमध्यें पडूं देतात. इतकें झाल्यावर विधि पूर्ण होतो. चार दिवस वन्हा- ड्यांना भोजन घालतात. पहिल्या दिवशी मुलीच्या मनगटास वाटोळें बांधलेले कंकण चार दिवस राहतें. वधूवरांस देणग्या देतात, व नंतर ही वधूवरें इतर सर्व मंडळीसह आपल्या घरी जातात. तेथे गेल्यावर ती दोघें “आपण एकमेक प्रामाणिकपणानें वागूं",