पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दू धर्मशास्त्र. ( ३. ) सहा देवांची पूजा करणारे.. ( ४.) सात देवांची पूजा करणारे. ज्यांचें गोत्र एक अशा माणसांचा एकमेकांशी विवाह होत नाहीं. राक्षसविवाह अजून चालू आहे असे पुढे लिहिलेल्या वण (ह्म वणी, प्रांतांतल्या माहितीवरून दिसून येते:- “पुरुष व स्त्रिया निरनिराळ्या ठिकाणी व अंतरावर, काम करतात. एकत्र मिळून करीत नाहींत. गोण्ड जातीतील एखाद्या पुरुषास लग्न करावें अशी इच्छा झाल्यास तो शेजारच्या खेड्यांत बायको करण्याजोगी कोणती मुलगी आहे ह्याविषयों माहिती मिळवितो. नंतर जेथें ती आपल्या सोबतीणींबरोबर काम करीत असेल तेथे आपल्या मित्रांस बरोबर घेऊन जातो. ती आपल्या मंडळींत मिळून आपल्या गांवांत पळून जावयाच्यापूर्वी जर हा. तिच्या हातास स्पर्श करूं शकेल, तरच त्याचे मित्र त्याच्या मदतीस जातात. एकादे वेळीं तिच्या जोडीच्या बायकांबरोबर ह्याची व ह्याच्या मित्रांची मारामारी होते. ही मारामारी एखादे वेळी हातास स्पर्श केल्यानंतरही होते. नंतर जरी त्या बाय- कांच्या मदतीस त्यांच्या गांवांतले पुरुष आले तरी एकदा हस्तस्पर्श झाला ह्मणजे त्या दोघांचा विवाह झालाच पाहिजे अशी चाल आहे. - C एका गोत्राच्या आंतील व बाहेरील माणसांबरोबर होणाऱ्या लग्नाचें वर्णन. तोच ग्रंथ पृष्ठे १८८-१८९ ) :- " मेलेल्या वडील भावाच्या विधवेशी लग्न कर ण्याची चाल सरहद्दीवरील लोकांत अजून चालू आहे; व ही चाल, एका स्त्रीनें पुष्कळ नंवरे करणे ह्या चालीचाच शेष आहे असे ह्मणतात. अशा विवाहानें स्त्रियांच्या बाजूने नातें उद्भवते. परंतु जसजशी लोकांची सुधारणा होत गेली, व भिन्न गोत्रांतील माण- सांशीं विवाह होत गेले, तसतसे बापाकडून नातें प्रसिद्धीस येऊं लागले. राक्षसी विवा- हाची चाल नाहींशी झाली, व तंट्याशिवाय, एकमेकांच्या खुषीनें लग्ने होऊं लागली. नंतर जशा सर्व हिंदुस्थानभर, व विशेषेकरून रजपूत लोकांत पोटजाती आढळतात त्या- प्रमाणे ह्मा गोत्रांपासून उत्पन्न होऊं लागल्या. जेव्हां एकादें गोत्र एका जागेपासून उठून दुसऱ्या जागेत जातें, तेव्हां त्या गोत्राचे आणखी पोटविभाग होतात. हे सर्व, ते लोक बाहेरच्या गोत्रांतून बायका मिळण्याच्या अडचणीमुळे करतात. वन्हऱ्हाड प्रां- तांत ह्या प्रकारची उदाहरणे आढळतात. उठून गेलेल्या लोकांचा पूर्वीच्या जागें- तल्या लोकांशी बिलकूल संबंध रहात नाहीं. वहाडांतील व नागपुरांतील प्रचार हे ह्याचें एक चांगलें उदाहरण आहे. राजबनसी व व-हाडांतील रजपूत ह्यांतही असेच आहे असे मला वाटतें, परंतु शिंदखेड येथील जाधव राजे व रजपुतान्यांतील जाती यांमध्यें परस्पर विवाह होतो. " (पृ० १८९) ५४ प्र०