पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तकदीधितीचें भाषान्तरः श्रुति, स्मृति, पुराण वगैरे मीमांसा व न्यायशास्त्र यांच्या विस्ताराचा विचार करून, मी अनंतभट्ट दत्तदीधिति नामक ग्रंथ रचितों. ॥ १ ॥ त्याविषयीं प्रथम दत्तकामध्यें ग्राह्य कोण व अग्राह्य कोण याचे विवेचन करितों. त्याविषयीं शौनक “ ब्राह्मणांनी स- पिंडामधून पुत्र प्रतिग्रह करावा. सपिंड न मिळेलं तर असपिंडांतही करावा. वि- येथें सपिंडांमध्येही भावाचा पुत्र मुख्य. तो नसेल तर कोणीही तो नसेल तर असगोत्र सपिंड. तोही नसेल तर असपिंड अस- जातीयांत करूं नये. " जवळचा सगोत्र सपिंड. गोत्रही ( ध्यावा ). 66 , त्यांतही बहिणीचा मुलगा व दौहित्र हे वर्ज करावे. तसेच विरुद्ध संबंधाची आपत्ति आल्याने भाऊ काका मामा इत्यादिकांप्रमाणे जे पुत्रत्वबुद्धि होण्यास अयोग्य हो - तील, तेही वर्ज करावे. ब्राह्मगादि तीन वर्षांनीं आपआपले वर्णांचाच दत्तक ( ध्या- वा). त्यांतही देशभेदामुळे झालेल्या गुर्जरत्वादिजातीसंबन्धें सजातीयच ( ध्यावा ) - पूर्वोक्त सर्व प्रकारचा दत्तक ज्याला भाऊ असेल तो, व जो ज्येष्ठ पुत्र नसेल तो ( ध्यावा )- शूद्रानें तर बहिणीचा मुलगा व दौहित्र हेही ध्यावे. याविषयीं प्रमाण मनु सां- गतोः एकापासून उत्पन्न झालेल्या भावांत एक जर पुत्रवान् असेल तर त्या पु- त्राच्या योगानें ते सर्व भाऊ पुत्रवान् आहेत असें मनूनें सांगितलें आहे. " ( या वच- नांत ) — एकजातानाम् ' या पदानेच भावांत हा अर्थ सिद्ध होत असतां पुनः भ्रातॄणाम् हें पद - जें आहे तें भाऊ आणि बहिणी या एकापासून जरी उत्पन्न झाल्या असल्या तर त्यांनी एकामेकांचा पुत्र ध्यावा असा नियम होत नाहीं हें बोधन करण्याकरितां आहे. ( तसें ) ' एकजातानां ' हें पद सापत्न भ्राते एकापासून उत्पन्न झाले असले तरी त्यांस दुसरा सपिंड मिळत असेल तर भावाचाच पुत्र घ्यावा हा नियम लागू होत नाहीं हें ज्ञापन करण्याकरितां आहे, सावत्र भावाचा मुलगा घेऊं नये हैं ज्ञापन करण्याकरितां नाहीं. “ ब्राह्मणादि तीन वर्णामध्यें बहिणीचा मुलगा दत्तक पुत्र कोठें होत नाहीं " या अर्थाला वृद्धगौतम स्मृति जशी प्रमाण आहे, तशी सावत्र भावाचा मुलगा न घेण्यास कोठेही स्मृतिप्रमाण उपलब्ध नाहीं. 6 ' एकः ' याचा अर्थ एकही असा आहे. त्याने ( बहुत भावांत ) दोघांस पुत्र अ- सेल व बाकीच्यांस नसले तरी त्यांस भावाचा मुलगा घेण्याचा असंभव नाहीं. कारण,