पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवाहाविषयीं. • दक्षिण. हिंदुस्थानांतल्या चाली. ( वऱ्हाड, मध्यदेश, मद्रास इलाका व मुंबई इलाका . ) मि. ए. सी. लायलनें ( सन १८७० साली ) केलेल्या वन्हऱ्हाड प्रांताच्या ग्याझे- टीरमधील उताऱ्यांचे भाषांतर:--'पुनर्विवाहाची चाल शेतकरी लोकांत सर्वत्र चालू आहे. ब्राह्मण खेरीज करून इतर जातींतही थोडथोडी चालू आहे. ब्राह्मणांप्रमाणे त्या प्रांतांतील उत्तरेकडील उदमी लोकांत, व कोणत्याही जातीच्या श्रेष्ठ कुळांतही, ही चाल चालू नाहीं. एकमेकांच्या संकेतानें घटस्फोट वॅ विभागपत्रे होतात, व घटस्फोट केलेली स्त्री पुन्हां लग्न करूं शकते. अशा गैरशिस्त रीतीने केलेल्या विवाहास पाट असे ह्मणतात. असा विवाह केल्याबद्दल कोणी कोणास दोष देत नाहीं, व अशा विवाहापासून झा लेल्या संततीस औरस मानतात. वृंजारी (ह्म. वणजारी ) व मानभाऊ लोकांमध्ये अगदी जुन्या काळचे, व चमत्कारिक विधि चालू आहेत. लग्नसंबंधी इतर सोहा- ळ्यांमध्यें जे हास्यकारक प्रकार दृष्टीस पडतात, ते यांच्या सर्व प्रकारच्या धर्मसंबंधी कृत्यांत आढळतात. प्र० २ . ५३ कांही जातींत कोठें कोठें ब्राह्मणांतही मामेबहिणीबरोबर विवाह करतात. कमी पायरीच्या लोकांत तर हा प्रकार फारच आढळतो. बायकोच्या बहिणीबरोबर वि- वाह करतां येतो; परंतु मेलेल्या नवऱ्याच्या भावाबरोबर करतां येत नाहीं. गोण्ड व वृंजारी-लोकांत असा प्रकार थोडथोडा आढळतो. परंतु कांहीं जातींत दुसरी एक अशी चमत्कारिक चाल आहे कीं, ज्या जातींत एकाच देवांची पूजा होत असेल, त्या जातींतील माणसांचा एकमेकांशी विवाह होत नाहीं. कुणची वगैरे कांहीं जा- तींतील लोक, अगोदर देवक ( ह्म पूज्य पदार्थ ) पाहतात. जीं झाडें व ज्या वनस्पति ज्या जातींत पूज्य असतील, त्या त्या झाडांच्या वनस्पतींच्या डहाळ्या लग्नाच्या वेळीं घरांत आणतात. लग्न करावयास दुसऱ्या कोणत्याही तऱ्हेचा प्रतिबंध मानीत नाहीत; तथापि, दोन्ही घराण्यांत तेच वृक्ष पूज्य आहेत असे आढळल्यास, त्या घराण्यांशी शरीरसंबंध करण्यांत येत नाहीं. रानटी गोण्ड लोकांमध्ये ही चाल विशेषेकरून आ- ढळते. वण प्रांतांतील गोण्ड लोकांत निरनिराळ्या जाति आहेत; व प्रत्येक जातींत निरनिराळी गोत्रे आहेत. प्रत्येक गोत्रास एक निराळें नांव असतें तें त्या गोत्रांतील सर्व माणसांस सारखेच असतें. निरनिराळ्या गोत्रांत, निरनिराळ्या देवांच्या पूजा करतात :- करणारे. ( १. ). चार देवांची पूजा ( २. ) पांच देवांची पूजा करणारे