पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८८ व्यवहारमयूख. वस्तूवर कोणाचा निर्वाह चालत असेल अशी वस्तु जप्त करणें, राजास योग्य नाहीं. १,७०७ अन्यायाने दंड घेतलेला असल्यास त्याचा व्यय काय करावा हे यामवल्क्य सां- गतो (व्य० श्लो० ३०७ ) " जो दंड राजानें अन्यायाने घेतलेला असेल तो त्यानें व- रु [देव] अर्पण करून त्यांचे तीसपट द्रव्य राजाने स्वहस्तानें ब्राह्मणास द्यावें. " याचा असा अर्थ कीं, तीसपट द्रव्य वरुणास अर्पण करण्याचे उद्देशाने संकल्प करून तें विप्रांस द्यावे. किरकोळ विषय प्रकरण समाप्त. चर्मण्वती व यमुना नदी यांचा शुभदायक संगम जेथे होतो त्याचे जवळ असणारे कीर्तिमान देशांचे मध्यभागी भरेह नांवाचे राजधानीव ईश्वरभक्तिपरायण भगवंतदेव नांवा- चा राजा राज्य करीत आहे. .. जगद्गुरु भट्टनारायण पंडित याचा पुत्र, पंडितमंडळाचें शिरोरत्न, व मीमांसादि गहन- विषयस्वरूप समुद्राचे पैलतीरास पोचलेल्या पंडितांचा अग्रेसर, भट्टशंकर, त्याचा पुत्र भट्ट- नीलकंठ, यानें श्रीशंकरवंशास शिरोभूषणास्पद राजाधिराज भगवंतदेव राजा याचे आज्ञेवरून रचिलेले भगवद्भास्कर नांवाचे ग्रंथांतील हें व्यवहारमयुख प्रकरण समाप्त. ७०७ वी० प० २२५ पृ० २; क० वि०; व्य० मा० .