पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ 66 व्यवहारमयूख. [ दुखावलेला मनुष्य ] ' धांवा धांवा ' ह्मणून ओरडल्यावरही तो न गेल्यास त्याब- द्दल त्यास दुप्पट दंड. " ' विक्रोशः ' ह्मणजे ओरडणें मनु (अ० ८ श्लो० २९६, २९७-२९८) “ मनुष्याचा प्राण घेण्याचा अपराध करणाऱ्या गसून, चोरीचे अपरा- घास जो दंड तो दंड तत्काळ घ्यावा. बैल, गाय, हत्ती, उंट किंवा घोडा व अने इतर मोठे पशु मारण्याबद्दल त्याचे ( वर सांगितलेल्याचे ) अर्वा दंड; लहान जनावरांस मारण्याबद्दल दंड दोनशे पण; व सुरेख चतुष्पाद व पक्षी यांस मारल्याबद्दल पन्नास पण दंड. गाढव, शेळी (बकरी), आणि मेंढी यांस मारल्याबद्दल दंड पांच माषक व कुत्रा किंवा डुक्कर मारल्याबद्दल एक माषक दंड. " मारलेले जनावराची किंमत देववून त्याशिवाय हा दंड असे समजावयाचे याश्वल्क्य (व्य० श्लो० ३०१ ३०२ ) जार पुरुषावर चोराचा आरोप जो आणील त्यास शिक्षा ह्मणून पांच पण दंड त्याजकडून देवविला पाहिजे. [ आरोप्याकडून ] लांच घेऊन जो त्यास सोडून देईल त्यास आठपट ( चार हजार पण ) दंड सांगितलेला आहे. " " उपजीव्य ' ह्मणजे घेऊन. " राजाचे अकल्याण व्हावें ह्मणून त्यास जो शापील, त्याची अप- कीर्ति जो पसरील, किंवा त्याच्या गुह्य गोष्टी ( मसलती ) बाहेर फोडील, त्याची जिव्हा कापून राजाने त्यास देशार करावें. " " अनिष्टं ' ह्मणजे मरणादिक. ' आक्रोशः ' (शाप ) ' तुझें राज्य बुडो,' इत्यादिक ह्मणणे. मनु ( अ० ९ श्लो० २७५ ) " राजाचे भांडारगृहांतील द्रव्य जे लुटतात, किंवा त्याच्या आज्ञांचा भंग [ निकरानें ] करण्यांत उयुक्त होतात, किंवा राजाचे शत्रूस मदत करतात त्यांस निरनिराळ्या जा- तींच्या अनेक शिक्षा केल्या पाहिजेत. १७०३ याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० ३०३ ) " प्रेतावरील वस्तु (वस्त्र दिक ) जो विकील, जो आपल्या गुरूस मारील, किंवा जो राजाचे गाडीत किंवा सिंहासनावर बसेल, त्यास सर्वात अतिभारी ( उत्तमसाहसाचा ) दंड केला पाहिजे." ' मृतांगलग्नं' ह्मणजे प्रेतावरील वस्त्र वगैरे. तोच स्मृतिकार ( व्य० श्लो० ३०४ ) “ दुसऱ्याचे दोन्ही डोळे जो फोडील त्यास, राजानें न करण्या- विषयीं ताकीद दिलेली कृत्यें जो करील त्यास, व जो शूद्र असून ब्राह्मणाप्रमाणे वागेल ( आचार करील ) त्यास, शिक्षा आठशे पण. ११७०३ याचा अर्थ असा कीं, वर सां- गितलेली शिक्षा, जो दुसऱ्याचे दोन्ही डोळे फोडील, जो राजानें मना केलेलें कृत्य क- रील, किंवा जो शूद्र जातीचा असतां ब्राह्मणाचे वृत्तीनें पोट भरील, त्यास. मिताक्षरा ग्रंथांत ( व्य० श्लो० ३०२ ) असें एक स्मृतिवचन उल्लेखित आहे " जर तो ( ह्मणजे 66 ७०२ वी० प० १५५ पृ० २; क० वि० व्य० मा० या मनुवचनाचा चौथा चरण येथे 'अरीणां चोपजापकान् '; परंतु वीरमित्रोदय ग्रंथांत 'हरेत्सर्वस्वमेवच', असा पाठ आहे. ७०३ क ० वि० व्य ० मा.