पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ दत्त्वात्मानं तु कस्मैचित्तद्गोत्रप्रवरोभवेत् || यद्वा स्वगोत्रनवरविधुरोजमदग्निजः ॥ विवाहं च न तेनैव गोत्रेण तु समाचरेदिति कश्चित् ||| देवोदासीयेऽपि । स्वगोत्रप्रवरा- ज्ञाने जमदग्निमुपाश्रयेत् । . तसेंच आश्वलायन ह्मणतोः ( श्रौतसूत्र उत्तरषट्क अध्याय ६, खण्ड १९, सू- त्रें ४--५ ): – “ पुरोहितप्रवरो राज्ञां ॥ ४ ॥ अथ यदि सार्ट प्रवृमीरन् मानवैलपौरूरवसेति॥५॥’ अशांच्या गोत्रांचा थांग केवल कुलपरंपरने काढून आचारानुसार लावल्याशिवाय गतिच नाहीं, ह्मणून ह्या सर्व विषयांस केक्ल मन्त्रादि वचनांच्या भाषांतरांच्याच धो- रणानें निर्णय करणे हे फार अप्रशस्त होय. तसाच क्षत्रिय व वैश्य यांच्या प्रवरांचाही थांगच नाहीं, कारण पुरोहितप्रव- रोराज्ञां " ह्या वाक्यावरून गोत्राबरोबर तोही यावा; परंतु आचारानें या स्थलीं वचनास फार मालिन्य असल्यामुळे, याचीही व्यवस्था त्यांच्या गोत्रासारखी देशरिवाजावरून होईल असे मला दिसतें, व जेथें पुरोहित बदलेल तेथें गोत्र व प्रवर हे बदललेच पाहि- जेत. तेव्हां अर्थात्, एक निर्बंध राहणें कठीणच आहे. ( ७३. ) गोलकांविषयी :- " अमृते जारजः कुण्डो मृते भर्त्तरि गोलकः " अशी मूळ उत्पत्ति दिसते. परंतु आतां ह्या स्वतंत्र जाती बनून, त्यांच्यामध्ये नूतन उत्प- त्तीचा प्रवेश होतो असें दिसत नाहीं. ह्याचे शरीरसंबंध केवल देशाचारानुसारच. होतील अर्से दिसतें; व आचारही पाहण्यांत आला तितका तसाच आहे. परंतु तो सर्व ब्राह्म- णांच्या कित्त्यानुसार आहे. 66 ( ७४. ) वाणस ह्मणून जी जात आहे तिचा विचार केला तर ते मूळचे ब्राह्मणच असावे व तशाच रीतीनेंते राहतात. परंतु त्यांची उत्पत्ति संन्याशांच्या दुर्वर्तनापा- सून दिसते; ह्मणून त्यांच्या विवाहांचा निर्वाह देशाचारतः होईल असे भासतें. ( ७५. ) हिंदुस्थानांत अनेक देश, राज्यें, व इलाके आहेत. तेथें व त्यांमध्यें, लग्नासंबंधीं विलक्षण चाली आहेत त्यांतून वाचकांस: अंशतः माहिती देण्याच्या हेतून पुढील टिपण तयार केले आहे. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांत चालू असणाऱ्या लग्नांच्या निरनिराळ्या चालींचा संक्षिप्त वृत्तांत.. ( कांहीं ठिकाणी स्थलसंकोचामुळे, कोणत्या पुस्तकांतून माहिती घेतली याविषयीं टीप मात्र दिली आहे. विशेष वर्णन करण्यास जागा नाही. )